bison on road in sindhudurg but no injury with teacher and his daughter 
कोकण

केवळ दोन मीटरच्या अंतरावर होते गवे ; त्याचक्षणी दुचाकी पडली बंद अन् ..

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दांडेली-घोणसेवाडी येथून मळेवाड रुग्णालयात जात असताना दुचाकी समोर अचानक गव्यांचा कळप आला. प्रसंगवधान राखत चालकाने आपल्यासह शालेय मुलीची सुटका केल्यामुळे अनर्थ टळला.

दांडेली घोणसेवाडी येथून तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष देवेंद्र माणगावकर हे आपल्या मुलीसह मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होते. घोणसेवाडी पुलाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक चार ते पाच गव्यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्याचक्षणी दुचाकी बंद पडली. गाडीपासून केवळ दीड ते दोन मीटरच्या अंतरावर गवे असल्याने मुलीने घाबरून आरडाओरड केली; परंतु पाच मिनिटे तरी गवे रस्त्यावर ठाण मांडून होते.

देवेंद्र माणगावकर यांनी प्रसंगावधन राखून दुचाकी सुरू केली व आपल्यासह मुलगी दीपीक्षाचे प्राण वाचविले. बांदा-शिरोडा मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांची गव्यांनी अनेकवेळा वाट अडविल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा धोकादायक प्राण्यांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष माणगावकर यांनी केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U9 Chess World No1: अवघ्या ८ व्या वर्षी जगाला नमवलं! आंबेगावची लेक बुद्धीबळात जगात नंबर १; मोडला सर्वात लहान वयाचा 'हा' मोठा रेकॉर्ड

US Iran Tanaav: अमेरिका-इराण तणाव वाढला; होर्मुझ सामुद्रधुनीतील टोल पद्धतीवर निर्बंधांचा इशारा..

ऑनस्क्रीन एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, सीन पूर्ण होताच.... ठरलं तर मगच्या सेटवर नक्की काय घडलं? Viral Video

Latest Marathi News Live Update : खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेणार

Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT