BJP Activists Claims Sawantwadi City Chief Ours 
कोकण

भाजपचे कार्यकर्त्ये म्हणतात सावंतवाडीचा नगराध्यक्ष आमचाच

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - शहरात मंत्री दीपक केसरकर यांना मिळालेले मताधिक्‍य लक्षात घेता याठिकाणी पक्ष वाढविण्यावर भर राहणार असून आगामी निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष असेल, असा दावा भाजप कार्यकर्ते संजू परब यांनी येथे केला. तर बबन साळगावकर यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष खुर्चीवरून राजकारण करणाऱ्यांची कीव येते, असा टोलाही परब यांनी विरोधकांना लगावला. 

येथील माजी खासदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद श्री. परब बोलत होते. नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अमित परब आदी उपस्थित होते.

भाजपचा बुथ भेटीवर भर

यावेळी श्री परब म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत भाजपचा थोडक्‍या मताने पराजय झाला असला तरी निवडणुकीत मिळालेली मते पाहता तालुक्‍यात भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या सूचनेनुसार उद्यापासून (ता.13) तालुकाध्यक्ष महेश सारंग व अन्य पदाधिकारी यांच्यासह तालुक्‍यातील प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांचे आभार मानणार आहोत. जानेवारीत दहा हजार सदस्य नोंदणी तालुक्‍यातून करून श्री. जठार यांना भेट देणार आहोत.'' 

सावंतवाडीत पक्ष वाढवण्यावर भर

श्री. परब पुढे म्हणाले, ""सावंतवाडी शहरात केसरकर यांना साडेतीन हजाराचे मिळालेले मताधिक्‍य लक्षात घेता या ठिकाणी पक्ष वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे. मराठी शहरातील सर्व नगरसेवक शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करून आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यावेळी पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम एक दिलाने करून याठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष बसवणार.'' 

नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून राजकारण करण्यापेक्षा याठिकाणी विकासाचे राजकारण करा असा टोला त्यांनी विरोधकांना मारताना नगराध्यक्षांची खुर्ची बबन साळगावकर ज्या रूममध्ये बसत तेथे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ती अडगळीत टाकण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही परब यांनी सांगितले. 

गाठीभेटीवर भर 
परब म्हणाले, ""येत्या आठ डिसेंबरला बांदा आणि आंबेगाव येथील सरपंचपदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने येथील कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेणार असून कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी कॉंग्रेसने मते फिरवल्यामुळे भाजप पुरस्कृत राजन तेली यांचा पराजय झाला. अन्यथा येथील चित्र वेगळे असते.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT