BJP district president Dr. Vinay Natu told the Collector 
कोकण

जन्मभूमीच्या लेकरांना लोंढे म्हणाल तर खबरदार ; डॉ. विनय नातू

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : जन्मभूमीच्या लेकरांना लोंढे म्हणाल तर खबरदार, येणारे लोंढे म्हणायला ते परप्रांतीय आहेत का अशा शब्दात माजी आमदार व उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष  डॉ. विनय नातू यांनी जिल्हाधिकारी यांना सुनावले आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतरच नियम पाळून ग्रामस्थ जिल्ह्यात येत आहेत. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली असे सांगून अपयश लपविण्यासाठी, आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असल्याचा आरोप डॉ. विनय नातू यांनी केला आहे.

कोकणात येणार्‍या जनतेला लोंढे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे वक्तव्य  केले. त्यामुळे चिडलेल्या डॉ. नातूंनी जिल्हाधिकार्‍यांना सुनावले आहे. 23 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर आजपर्यंत मिळालेल्या कालावधीत अनेक गोष्टी जिल्हाधिकार्‍यांना करता आल्या असत्या. मात्र परिस्थिती डोळ्यासमोर दिसत असतानाही सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष का केले. आपल्या बेजबाबदार कारभाराचे खापर जनतेवर फोडायचे काम करु नका. कोरोना बाबतीत मोठमोठ्या घोषणा करण्याच्या आधी जिल्ह्यातील यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यात का आले नाही.

जिल्हा प्रशासन जबाबदारी झटकतेय​

आता कुठे इतरत्र असणारे जिल्हावासीय सरकारने परवानगी दिल्यानंतर शासन नियम पाळून जिल्ह्यात येऊ लागले तर लगेच परिस्थिती हाताबाहेर कशी गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून इतर राज्यांनी जबाबदारीने आपल्या नागरिकांना मोफत आपापल्या राज्यात नेले आणि इथे राज्यांतर्गत प्रवासालाही तिप्पट भाडे आकारणी करण्यात येत आहे. हा जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT