BJP leader and supporter of Nanar project Pramod Jathar , narayan rane 
कोकण

"अभ्यास नसलेल्या माणसाला आम्ही केंद्रात पाठवले हीच आमची चुक"

.मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : खासदार नारायण राणेंचा नाणार प्रकल्पाला असलेला विरोध मावळला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी नाणार प्रकल्पाचे काम सुरू होईल. असा विश्‍वास भाजपचे नेते आणि नाणार प्रकल्पाचे समर्थक प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. खासदार विनायक राऊत यांच्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोपही त्यांनी केला. 


ते म्हणाले, भाजपने नाणार प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पाबाबत भाजपची जी भूमिका असेल तीच माझी आहे. असे खासदार नारायण राणे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंही या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत. मात्र खासदार राऊत यांच्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. भाजपची अडीज लाख मते राऊत यांना मिळाली म्हणून ते निवडून आले. अभ्यास नसलेल्या माणसाला आम्ही केंद्रात पाठवले हीच आमची चुक झाली. 4 लाख कोटीच्या या प्रकल्पामुळे साडेतीन ते चार हजार कोटी रुपये कामगार वेतनाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येणार आहेत. प्रकल्प उभारताना नागरिकांचे जीवन, आंबा - काजू, मासे आणि येथील पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली होती. सरकारने त्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तरीही राणेंचा प्रकल्पाला विरोध कायम आहे. 2024 च्या निवडणूकीनंतर ते दिल्लीत दिसणार नाही याची काळजी भाजप घेणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून कृषी कायदे आणले आहेत. महाविकास आघाडीचे प्रणेते खासदार शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात एपीएमसी कायद्याचे समर्थन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी ते आत्मचरित्र वाचावे नंतर कृषी कायद्याला विरोध करावा. काही ठिकाणी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशी नागरिकांची तक्रार आहे. चौपदरीकरण करणार्‍या ठेकेदाराकडे पंधरा वर्ष रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घेतले जाणार आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष आमच्याबरोबर आला तर या पक्षाबरोबर युती होईल अन्यथा भाजप यापुढील सर्वच निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT