bjp leader mahesh sarang speech in sawantwadi
bjp leader mahesh sarang speech in sawantwadi 
कोकण

कामगारांना लुटणार्‍यांविरूद्ध आवाज उठवणार 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - असंघटित कामगार हे गरीब आणि कष्टकरी आहेत. त्यांना लुबाडण्याचा जो प्रकार चालू आहे त्याविरोधात भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नसून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विधान परिषदेत हा प्रश्‍न मांडण्यात येईल. असंघटित कामगारांकडून तिकीट देताना दोनशे रुपये घेतले जात आहेत. अशा एजंट आणि त्यात सामील असलेल्या अधिकार्‍यांविरोधात भारतीय जनता पार्टी आवाज उठविणार, असा इशारा आज येथे पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकारी महेश सारंग यांनी दिला. 

ते म्हणाले, “अनेक कामगारांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या असून त्यांच्याकडून कीट देण्यासाठी दोनशे रुपये आकारण्यात येत आहेत. अशाप्रकारे एजंट व अधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे. अशा गोष्टींकडे अधिकारी दुर्लक्ष कसे काय करतात. मोफत कीट वितरण करणे आवश्यक असतानाही 200 रुपये घेऊन गरिबांना व कामगारांना लुटायचे काम होत आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. असंघटित कामगारांकडून पैसे घेऊन करोडो रुपये गोळा करण्यात येत आहेत. याबाबत विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करण्यात येणार आहे. आमदार राणे यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांच्या प्रश्‍नाला आम्ही न्याय देणार आहोत. या जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना असंघटित कामगारांच्या समस्येची जाण असूनही ते गप्पच आहेत; मात्र भाजप गप्प बसणार नाही. भ्रष्टाचारामध्ये जे एजंट सामील आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू.

याबाबत आपण तक्रारही देणार आहोत. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्‍न मांडणार आहोत.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT