Chitra wagh esakal
कोकण

भाजप पूरग्रस्तांच्या पाठीशी ; चित्रा वाघ यांची ग्वाही

पूरग्रस्तांशी साधला संवाद; कामकाजाचा आढावाही

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करीत पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे राहत असल्याची ग्वाही चित्रा वाघ यांनी पूरग्रस्तांशी बोलताना दिली.

ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहातील भाजप मदतकेंद्राला भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले. चिपळुणात २२ रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसह स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तीने पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. यामध्ये भाजपादेखील मागे नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार नीलेश राणे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी आमदार मधू चव्हाण, आमदार प्रसाद लाड आदी भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला आहे.

दरम्यान, या वेळी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी निलम गोंधळी, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, नगरसेवक निशिकांत भोजने, परिमल भोसले, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, नगरसेविका रसिका देवळेकर, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलासा दिला..

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला तसेच व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत व्यथा जाणून घेतल्या. या वेळी कोकणातील जनतेच्या धैर्य आणि संयमाचे चित्रा वाघ यांनी कौतुक केले. याचबरोबर पूरग्रस्त भाजपा पदाधिकारी नगरसेवक परिमल भोसले, वैशाली निमकर यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि दिलासा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News, : 'माझ्या मुलाला फाशी द्या..'; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद सनदीच्या वडिलांनी मागितली गावकऱ्यांची माफी

पोलिसांवर आली 'धक्का' मारण्याची वेळ! कैद्यांनी भरलेली बस भररस्त्यात पडली बंद अन्...

पंजाब किंग्सच्या संघात शोककळा! IPL 2026 सुरु असतानात अष्टपैलू खेळाडूच्या आईचे निधन

विहिनीशी प्रेमसंबंध, लग्नास नकार दिल्याने दिराने गळा चिरून केली हत्या, भंडाऱ्यात धक्कादायक घटना...

Ratnagiri LPG Ship : भारत की पाकिस्तान? मालकांचा वाद, ओमानवरून 1800 टन एलपीजी गॅस घेऊन जयगड बंदराकडं निघालेलं जहाज अरबी समुद्रात रत्नागिरीजवळ अडकलं

SCROLL FOR NEXT