कोकण

तेंडोलीत भाजपचे जोरदार ‘कमबॅक’

CD

88799

तेंडोलीत भाजपचे जोरदार ‘कमबॅक’

भरीव मताधिक्य ः ठाकरे शिवसेनेला धक्का

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला धक्का देत भाजपने जोरदार ‘कमबॅक’ केले. भाजपला या मतदारसंघात सर्वाधिक २२५० चे मताधिक्य मिळाले, असे ज्येष्ठ नेते नीलेश तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाने २२५० चे मताधिक्य देत पहिल्या क्रमांकावर आणले. केंद्रीय मंत्री राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाचे प्रभारी आनंद शिरवलकर, अभय परब, ज्येष्ठ कार्यकर्ते नीलेश तेंडुलकर, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश प्रभू, राजू राऊळ, समाधान परब, दाजी गोलम, अक्षय तेंडोलकर, विघ्नेश गावडे, सतीश गावडे, भरत गावडे, दादा चव्हाण, अशोक कंदूरकर या सर्वांनी तेंडोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महत्त्वपूर्ण काम केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सरचिटणीस रणजित देसाई यांनी अवघी ६०० मते मिळविली होती. त्यानंतरच्या स्थानिक निवडणुकीतही तेंडोली गावात ठाकरे गटाचा वरचष्मा होता; मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मोट बांधत वाडीवार प्रचार केला. त्यामुळे भाजपच्या कमळ निशाणावर १०५८ मते पडली. निवडणूक कालावधीत डॉ. नीलेश राणे यांनी तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी थेट संवाद साधला होता. दत्ता सामंत यांनीही माड्याचीवाडी, तेंडोली येथील अनेक बैठका घेतल्या होत्या. या मताधिक्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग होता, असे श्री. तेंडुलकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT