Black Panther seen in Janshi Bakale region in Rajapur Taluka  
कोकण

राजापूर तालुक्यातील जानशी, बाकाळे परिसरात ब्लॅक पॅंथरचा वावर ? 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - सुमारे पाच वर्षापूर्वी तालुक्‍यातील ओणी येथे भक्ष्याचा पाठलाग करणारा दुर्मिळ ब्लॅक पॅंथर विहिरीत पडल्याची घटना घडली होती. आता जानशी, बाकाळे परिसरामध्ये ब्लॅक पॅंथरचा मुक्तपणे संचार असल्याचे लोकांकडून चर्चिले जात आहे. काही ग्रामस्थांनी सायंकाळी उशिरा जंगल परिसरामध्ये ब्लॅक पॅंथर फिरत असल्याचे पाहिल्याचा दावाही केला आहे. 

जानशी, बाकाळे परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वी अनेकवेळा विविध घटनांच्या माध्यमातून पुढे आले आहे. या परिसरामध्ये ब्लॅक पॅंथरचा वावर असल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला आहे. सायंकाळी उशिरा जंगल परिसरामध्ये ब्लॅक पॅंथर फिरताना दर्शन झाल्याचे काही ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. 

काही वर्षापूर्वी विहिरीमध्ये ब्लॅक पॅंथर पडल्याची घटना राजापूर तालुक्‍यामध्ये घडली होती. त्यामुळे तालुक्‍याच्या जंगल परिसरामध्ये ब्लॅक पॅंथर असण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र, जानशी बाकाळे परिसरामध्ये ब्लॅक पॅंथर दिसल्याबाबत वनविभागाशी कोणीही अद्याप संपर्क साधलेला नाही. ब्लॅक पॅंथरचे वास्तव्य असल्याच्या काही खाणाखुणा आढळल्यास संवर्धनासह जनजागृतीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करू. 
- सदानंद घाटगे, वनपाल, राजापूर  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT