black rice research in konkan ratnagiri in agriculture research center
black rice research in konkan ratnagiri in agriculture research center 
कोकण

'ब्लॅक राइस' वर उमटणार कोकणी मुद्रा ; संशोधन सुरू

नरेश पांचाळ

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने संकरित भाताच्या अनेक जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या कृषी संशोधन केंद्रात आजपर्यंत रानटी वाण म्हणून गणलेल्या 'ब्लॅक राइस'वर काम सुरू आहे. पूर्णतः काळे व जाड असणारे हे बियाणे येथील संशोधन केंद्रातून वरून सफेद, आतमध्ये काळ्या रंगाचे व बारीक कसे करता येईल, यावर संशोधन सुरू आहे. 

शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या चविष्ट ब्लॅक राइसची चव शेतकऱ्यांना दोन वर्षात चाखता येईल, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 
ब्लॅक राइस हे शेतात ते खूप उंच वाढते, लांब दाणा तसेच लोळणारी जात आहे. कोकणात याचा उपयोग करून घेण्यासाठी संशोधन केंद्राने प्रयोग करून वरून सफेद भातासारखे व आतमध्ये काळ्या रंगाचे बारीक बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. जेनेटिक व्हेरिएशन करण्याचे काम सुरू आहे. 

"कोकणात कमी उंची, बारीक तांदूळ असलेल्या भाताला मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे, असे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले. बारीक दाण्याच्या ब्लॅक राइसचे बियाणे शेतकऱ्यांना दोन वर्षात उपलब्ध होईल. काळ्या रंगाचे व बारीक बियाणे निर्मितीसाठी संशोधन सुरू आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढू शकते. दोन वर्षात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे."

- डॉ. भरत वाघमोडे, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव

एक दृष्टिक्षेप... 

  • ब्लॅक राइस हे रानटी वाण म्हणून दुर्लक्षित 
  • आसाममधून हे वाण उपलब्ध केले 
  • ते जाड दाण्याचे व आतून बाहेरून काळ्या रंगाचे 
  • शेतात ते खूप उंच वाढते, लांब दाणा तसेच लोळणारी जात आहे. 


 जेनेटिक व्हेरिएशन बदल करण्याचे काम 

लाल-भात बियाणे आणि ब्लॅक राइस दोन्हीमध्ये न्युट्रीशियन, आर्यन, फायबर, झिंक असते. मानवाच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याची जास्त क्षमता ब्लॅक राइसमध्ये जास्त आहे. प्रथिनांमुळे बियाण्यात रंग प्राप्त होतो. गेल्या वर्षाभरापासून यावर संशोधन सुरू आहे. केंद्राच्या शेतावर भात लावणीपासून ते त्यांचा जेनेटिक व्हेरिएशन बदल करण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामात संशोधन केंद्राचे तज्ज्ञ व कर्मचारी सक्रिय सहभागी आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT