Boat facility for Tilari forest konkan sindhudurg 
कोकण

पावसाळ्यानंतर तिलारी जंगल सफारी बिनधास्त होणार?

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून "तिलारी जंगल सफारी' बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर पर्यटनाला पुरक बोट ठरणार आहे. 

कोरोनाच्या संकटानंतर ही बोट पर्यटनासाठी देखील उपयुक्त असून हेवाळे संस्थेकडे बोट सुपूर्द केली आहे. माजी अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी "चांदा ते बांदा' योजनेतून पाच लाख रुपये दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केले होते. यामधून 12 प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण केली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील त्यासाठी जॅकेट व अन्य सुविधा देखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले. 

तिलारी पाटबंधारे धरणाच्या येथे जंगल सफारीसाठी पर्यटकांना ही उपयुक्त असून तिलारी जंगल सफारी म्हणून या बोटचे नामकरण केले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणाला देखील या बोटीचा फायदा होईल, असे उपवनसंरक्षक चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी बोलताना सांगितले. 

...तर जलविहार शक्‍य 
पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत नुकत्यात या बोटीची चावी हेवाळे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाली तर पावसाळ्यानंतर या बोटीचा पर्यटकांना जलविहार करण्यासाठी फायदा होईल, अशी शक्‍यता वनखात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे बोट पर्यटनाला उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT