Botulism disease of animals in the sindhudurg district sakal media
कोकण

Sindhudurg : जिल्ह्यात जनावरांना बोटूलिझम आजार

पशुसंवर्धन अधिकारी; कॅल्शियमयुक्त औषध देण्याचे आवाहन

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात बोटूलिझम आजार सदृश्य पशुधन सापडू लागले आहे. तरी नागरिकांनी आपली जनावरे गोठ्यात बांधून त्यांना कॅल्शियमयुक्त औषध द्यावी व गोठ्यातच चारा द्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दिलीप शिंपी यांनी केले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या जरी आधुनिक पद्धतीने शेती केली जात असली तरीही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून गाई, म्हैस यांसारखी दुधाळ जनावरे बाळगतात. जिल्ह्यातील पशुपालक आपले पशुधन चाऱ्यासाठी सोडत असतात. अशावेळी जनावरे मोकळ्या जागेत मिळणारी हाडे चघळतात. ही हाडे चघळल्याने बोटूलिझम आजार होण्याची दाट शक्यता असते. पावसात ही हाडे भिजल्याने यावरती बुरशी तयार होते. ही हाडे जनावराने चघळल्याने आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे गोठ्यात बांधावी. त्यांना खाजगी किंवा शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामधून कॅल्शियम औषधे द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिंपी यांनी केले आहे.

कोंबडी, कुत्रा, मांजर, गुरे आदी जनावरे मृत पावल्यास त्यांचे मृतदेह उघड्यावर न टाकता ते लगेच जमिनीत पुरावेत, असे केल्यास जनावरांना हा आजार होण्याची प्रमाण कमी होईल. काळसे (ता.मालवण) येथे पाच जनावरे दगावली होती. ही जनावरे या बोटूलिझम आजारामुळे दगावली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT