Boxwell wall removal work start Kankavli sindhudurg 
कोकण

कणकवलीत बॉक्‍सवेल भिंत हटविण्याचे काम सुरू 

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणात धोकादायक झालेली शहरातील बॉक्‍सवेलची भिंत हटविण्याचे सुरू करण्यात आले आहे; मात्र हटविलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पुन्हा बॉक्‍सवेल भिंत होणार, की उड्डाणपुलाचे विस्तारीकरण होणार? याबाबत अनिश्‍चितता आहे. उड्डाणपुल विस्तारीकरणासाठी 40 कोटींची आवश्‍यकता असून, त्या खर्चाला अद्याप केंद्र शासनाने मंजुरी दिलेली नाही. 

शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्‍सवेल भिंतीचा भाग यंदाच्या पावसाळ्यात कोसळला होता. त्यानंतर बॉक्‍सवेलची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. तर सध्या हा धोकादायक भाग हायवे ठेकेदाराकडून पूर्णतः काढून टाकला जात आहे.

दरम्यान, धोकादायक ठरलेली बॉक्‍सवेल भिंत काढून तेथे नव्याने प्लेट बांधून भिंत उभारली जाणार होती; परंतु भिंती ऐवजी उड्डाणपुलाची मागणी विविध राजकीय पक्ष आणि शहरवासीयांकडून झाली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू होणार होते. त्याअनुषंगाने शहरातील वाहतूक मसुरकर किनई आणि टेंबवाडी रस्ता मार्गे वळविण्याचीही तयारी पोलिस प्रशासनाने केली होती; मात्र आता केवळ धोकादायक भिंत हटविली जाणार आहे. तसेच तेथे नवीन भिंतीचे काम होणार नसल्याने पोलिस बंदोबस्त आवश्‍यक नसल्याचे महामार्ग विभागाने कळविले आहे. 

संपादन - राहुल पाटील
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT