कोकण

वातावरण बदलल्याने मच्छीमारीला पुन्हा "ब्रेक' 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - पंधरा दिवसांनी वातावरण निवळल्याने समुद्रात झेपावलेल्या मच्छीमारांची निराशा झाली. शनिवारी (ता. 14) एक दिवस समाधानकारक मच्छी काहींना मिळाली; मात्र एका रात्रीत वातावरणाने रंग बदलला आणि मच्छीमारांचे दिवस फिरले. वेगवान वारे, पाण्याला असलेला करंट यामुळे मासेमारीत अडथळा येत होता. त्यामुळे एका दिवसात पुन्हा मच्छीमारीला ब्रेक लागला. ट्रॉलिंग, फिशिंगला काही प्रमाणात मासळी मिळत होती; पण बदलत्या वातावरणाने फटका बसला आहे. 

हंगाम सुरू झाल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नैसर्गिक संकटाने मच्छीमार बेजार झाले. शेकडो नौका गेले 15 दिवस बंदरातच होत्या. परजिल्ह्यातून आणलेल्या खलाशांवर लाखोंचा खर्च करावा लागला होता. उत्पन्न शून्य आणि खर्च अधिक अशी परिस्थिती होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वातावरण निवळल्याने मच्छीमारांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता. 14) मच्छीमार समुद्रात झेपावले. 5 ते 6 नौकांना दीड ते दोन टन गेदर, दीड ते दोन टन वाशी अशी मासळी पर्ससिननेटला मिळाले. ट्रॉलींगला काहींना 200 ते 500 किलो म्हाकूळ मिळाले. फिशिंगला पापलेट, ढोमा, सौंदाळे मिळाले. मासळीचा रिपोर्ट मिळाल्याने शेकडो नौका समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाल्या; मात्र शनिवारी रात्रीच वातावरण बदलल्याने त्यांची निराशा झाली. 

खोल समुद्रात वाऱ्याचा वेग वाढला तर पाण्यालाही करंट आहे. लाटांमुळे जाळी स्थिर राहत नव्हती. मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी एकमेकाला चिकटून नौकांच्या पंख्यात अडकण्याची भीती होती. शनिवारी कुर्ली येथे मासेमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याने मच्छीमार आणखीनच धास्तावले. अनेक मच्छीमार मासेमारी न करता समुद्रात उभे आहेत. मिरकरवाडा येथील काही नौका तुळसुंदे, जयगड, दाभोळ किनाऱ्यावर सुरक्षेसाठी धावल्या. दाभोळ येथील ट्रॉलिंगवाले मासळी पकडून मिरकरवाडा येथे दाखल झाले होते; मात्र त्यांनी रविवारी (ता.15) सकाळी परतीचा प्रवास सुरू केला. 

मासळीचे दर 

  • गेदर ः 70 ते 75 रुपये किलो 
  • वाशी ः 15 ते 20 रुपये किलो 
  • पापलेट ः 120 ते 500 रुपये किलो 
  • म्हाकूळ ः 160 रुपये किलो 

किनाऱ्यावर मिनी पर्ससिनचा धुमाकूळ 
किनारी भागात मासळी मिळत असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर विनापरवाना मिनी पर्ससिन नौकांनी धुमाकूळ घातल्याची चर्चा सुरू आहे. पापलेट, सौंदाळासारखी मासळी मिनी पर्ससिनला मिळत होती. या मासळीला दर चांगला मिळत असल्याने त्याचा फायदा त्यांनी उठवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT