Bribery case kudal konkan sindhudurg 
कोकण

लाच मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? वाचा...

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण भूसंपादनाच्या दुसऱ्या निवाड्यातील एका उद्योजकाच्या मंजूर झालेल्या 33 लाखाच्या रकमेपैकी 5 लाखाची मागणी महसुल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली. याची कसुन चौकशी झाली पहिजे, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली. हा प्रकार आज येथे घडला. 

पिंगुळी गुढीपुर येथील एका उद्योजकाचे महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन निवाड्यातील दुसऱ्या टप्प्यातील 36 लाख रुपये मंजूर झाले होते. ही मंजूर झालेली रक्कम येथील एका बॅंकेच्या शाखेत जमा होण्याची प्रकिया सुरू होती. ही रक्कम लगेच जमा होण्यासाठी महसुलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 5 लाख द्यावे लागतील, अशी मागणी सुरूवातीला संबंधित बॅंकेच्या एका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.

उद्योजकाने अन्य बॅंकेचे कर्ज असल्यामुळे आपल्याला पाच लाख देणे शक्‍य नाही असे सांगितल्यानंतर ही मागणी अडीच लाखावर आली. ती मान्य झाली. या संवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी अतुल बंगे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी संबंधित महसुलमधील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही रक्कम वितरित करण्याचा विषय मांडला; मात्र याकडे दुर्लक्ष केले.

याबाबत आमदार नाईक यांनी संबंधितास धारेवर धरले. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, अतुल बंगे, राजन नाईक, राजू गवंडे, बाबी गुरव, राजू जांभेकर, किरण नाईक उपस्थित होते. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याची बाजू घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी मीडियाला टाळत कार्यालय गाठले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक

Pune Agriculture College: फिल्टरमध्ये करंट उतरला, बीडच्या विद्यार्थ्याचा पुण्यात मृत्यू; कृषी महाविद्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT