The bridge at Talvedi was damaged due to rain 
कोकण

तळीवाडीतील मोरी अतिवृष्टीने खचली 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - केळुस-दाडोबा देवस्थान तळीवाडी येथे अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील खचलेली मोरी, या भागातील बंद झालेल्या एसटी बस, नागरिकांना तसेच वाहनधारकांना प्रवासाची उद्भवलेली समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी गुरुवारी (ता.1) बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसोबत पाहणी केली. हे पूल आरसीसीने बांधकाम आणि शेती भागातील नुकसान होऊ नये, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने वॉलकंपाऊंड बांधावे, या दृष्टीने अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना सौ. नाईक यांनी दिल्या. 

मार्चअखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळुस-कालवीबंदर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दाडोबा देवस्थान तळीवाडी भागातील पावसाळी पाणी पाण्यासाठी बांधलेली मोरी (छोटे पूल) पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खचली. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. 

या गावात कुडाळ व वेंगुर्ले आगारातून प्रत्येकी दोन बसेस कालवीबंदर भागात येत होत्या; मात्र मोरी खचल्याने एप्रिलपासून त्या बसेस बंद झाल्या आहेत. याबाबत केळुसचे उपसरपंच आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक व जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. नाईक यांनी या भागातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपअभियंता व शाखा अभियंता यांचे समवेत पाहणी केली. 

यावेळी शाखा अभियंता सुहास टेमकर, शाखा अभियंता प्रीतम पवार, ग्रामसेवक विवेक वजराटकर, सरपंच किशोर केळुसकर, उपसरपंच आबा खवणेकर, सदस्य महेंद्र वराडकर, सुमन पराडकर, पांडुरंग शिवलकर, गुरुनाथ मुणनकर, आनंद केळूसकर, अंकुश कुडव, वासुदेव बोवलेकर, कृष्णा केळुसकर, बाबू केळुसकर, गोपाळ वेंगुर्लेकर, नामदेव नागवेकर, दत्ताराम बोवलेकर, तुकाराम केळुसकर, मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन गोविंद केळुसकर उपस्थित होते. 

ग्रामस्थांच्या मागणीची दखल 
आरसीसी बांधकाम करून पुलाची उंची वाढविण्यासह तेवढ्या भागातील रस्त्याची उंची वाढविण्याची तसेच दुसऱ्या बाजूस शेती-बागायती असल्याने त्या बाजुला दुतर्फा संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार सौ. नाईक यांनी जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याचे प्रभारी उपअभियंता गणेश ठाणेश्‍वर यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना दिल्या. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

SCROLL FOR NEXT