BSNL internet service range connection in konkan are was poor private company compare best service in ratnagiri
BSNL internet service range connection in konkan are was poor private company compare best service in ratnagiri 
कोकण

कोकणातून आता बीएसएनएलला 'बायबाय' केले जाण्याची शक्यता ?

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : रेंज आणि कोलमडलेली इंटनेटसेवा आदींमुळे बीएसएनएल सेवेचा ग्रामीण भागातील बोजवारा उडाला आहे. तो कधी पूर्ववत होईल याचीही शाश्‍वती नाही. त्यातून त्रस्त झालेल्या तालुक्यातील पाचल परिसरातील गावांत लोकांनी इंटरनेटसेवेसाठी खासगी ब्रॉडबँड सेवेकडे मोर्चा वळविला आहे. या भागातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये शंभरहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन घेण्यात आली असून त्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे पाचल परिसरातील लोकांना 'वर्क फ्रॉम होम' आणि मुलांना ऑनलाईन शिक्षण सुलभ झाले आहे.

पाचल परिसरात बीएसएनएलसह आयडीया, जिओ आदी सेवा कार्यरत आहेत. त्यामध्ये बीएसएनएलकडून थ्रीजी सेवा देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ही सेवा अपवादानेच कार्यान्वित आहे. काही गावांमध्ये अनेक दिवस मोबाईल सेवा कोलमडलेली असते. रायपाटण, पाचल आदी गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र अद्याप टॉवर उभा राहिलेला नाही. काही गावांत उभारलेले टॉवर बंद आहेत. त्यामुळे इंटरनेट आणि रेंजचा बोजवारा उडाला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत होते. तसेच शिक्षणही ऑनलाईन सुरू झाले आहे. 

मात्र बीएसएनएनलच्या बोजवार्‍यामुळे कामे करणे आणि मुलांना शिक्षण घेणे शक्य होत नव्हते. बीएसएनएलने चांगली सेवा द्यावी, यासाठी वारंवार मागणी करूनही ग्राहकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्या. त्यामुळे त्रस्त पाचलवासीयांनी इंटरनेटसेवसाठी खासगी ब्रॉडबँड सेवेकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाचल परिसरातील गावांमधील लोकांनी खासगी कंपनीच्या ब्रॉडबँड सेवेची शंभरहून अधिक कनेक्शन घेतली आहेत. खासगी ब्रॉडबँड सेवेला चांगला स्पीड मिळत आहे. त्यामुळे 'वर्क फ्रॉम होम' आणि शाळकरी मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे सहज शक्य  झाले आहे. 

बीएसएनएलला 'बायबाय'

खासगी कंपनीची ब्रॉडबँड सेवा अशीच सुरळितपणे सुरू राहिल्यास पाचल भागातील बीएसएनएल सेवेला लोकांकडून 'बायबाय' केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT