Aditya Thackeray
Aditya Thackeray  sakal
कोकण

राजापूर : धोपेश्‍वर रिफायनरीद्वारे विकासाची गुढी उभारा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : 'सरकार तुम्ही दाद घ्या ना... रिफायनरी राजापूरला द्या ना', अशी साद घालत महिलांसह राजापूरवासीयांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे 'धोपेश्‍वर रिफायनरी झालीच पाहिजे', अशी आग्रही मागणी केली. या वेळी महिलांनी ठाकरे यांना गुढी भेट देऊन धोपेश्‍वर रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगाची म्हणजेच राजापूरच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभारण्याची मागणी केली. या वेळी ठाकरे यांनीही महिलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

राज्याचे पर्यावरणमंत्री ठाकरे आजपासून रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आहेत. सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे जात असताना राजापूरवासीयांसह रिफायनरी समर्थकांनी ठाकरे यांची मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. या वेळी खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना विभागप्रमुख संतोष हातणकर, रिफायनरी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर, पंढरीनाथ आंबेरकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

शासकीय विश्रामगृहावर ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना महिलांनी 'सरकार तुम्ही दाद घ्या ना ... रिफायनरी राजापूरला द्या ना', अशी काव्याच्या माध्यमातून रिफायनरीची जोरदार मागणी केली. राजापूरच्या सर्वांगीण विकासासह महिलांच्या हाताला काम, युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याची मागणीही महिलांनी या वेळी केली. ठाकरे यांना गुढीची भेट देऊन राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगाची गुढी उभारण्याची मागणी त्यांनी केली.

भूमिपुत्रांच्या हाताला काम

यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांशी संवाद साधताना ठाकरे यांनी महिलांसह स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम आणि नोकर्‍या मिळणे गरजेचे असून, सर्वांना विश्‍वासात घेऊन रिफायनरी प्रकल्प उभारणी करण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT