Businesses In Orange Green Zone Will Get Comfort Vinayak Raut Comment 
कोकण

ऑरेंज, ग्रीन झोनमधील उद्योगधंद्यांना दिलासा मिळेल - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - चाकरमान्यांनी स्वतःची काळजी घेताना कोकणवासियांना त्याचा त्रास होणार नाही यादृष्टीने कार्यरत राहूनच 30 एप्रिलनंतर त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आपल्या घरात सुरक्षित राहावे. ऑरेंज व ग्रीन झोनमधील उद्योगधंदे सुरू करणे तसेच बागायतदार शेतकरी यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्यशासन दिलासा देणारा निर्णय घेईल, असे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सांगितले. 

भारत देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्यशासन, प्रशासन यंत्रणा आपापल्यापरीने कार्यरत झालेली आहेत. पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतर्क झालेला आहे. गेले 23 दिवसाच्या कालावधीत राज्यातील बरेच जिल्हे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत आहे. एप्रिल, मे म्हटला की, चाकरमान्यांची ओढ कोकणाकडे लागलेली असते.

सध्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड हे भाग रेड झोनमध्ये येत असल्यामुळे या भागात आपला चाकरमानी मोठ्या प्रमाणात आहे. या कालावधीत आपल्याच घरी सुरक्षित राहावे, या अनुषंगाने बोलताना खासदार राऊत म्हणाले, ""लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर चाकरमान्यांना कोकणात यायचे असेल तर त्यांनी एप्रिलनंतर जावे; पण कोकणात येण्यापूर्वी त्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतानाच आपल्यापासून कोकणवासियांना कोणताही त्रास होणार नाही, याची सर्वप्रथम दखल घेऊन त्यांनी कोकणात पाऊल टाकावे.'' 

ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये जे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी उद्योगधंदे पूर्वपदावर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एकंदर वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच राज्यशासन पावले उचलण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहे. सद्यस्थितीत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या ठिकाणी घरोघरी आरोग्य यंत्रणेमाफत सर्व्हे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 


सध्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित आहे. रत्नागिरीत थोडासा प्रॉब्लेम आहे; पण हा प्रश्‍न मार्गी लागेल. आपण संघटितपणे कोरोनाशी लढा दिला तर हा कोरोना हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही. कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली आहे. बागातदार, शेतकरी यांचा आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा हा कालावधी असताना सुद्धा त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या सर्वांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून येत्या गुरुवारी, रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा तर शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. 
- विनायक राऊत, खासदार  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT