businessman and sellers face problem in chiplun ratnagiri 
कोकण

शासनाने आमचा व्यवसाय बंद केल्यास खायचे काय? हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणारे वडापाव, चुरमुरे, चहा, रस विक्रेते, हॉटेल, खानावळ, पानदुकान व सलून व्यावसायिकांना बसला आहे. आता आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावयाचा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्याची सक्त अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. सकाळपासून शहरात फिरून पालिका व पोलिसांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता, अन्य सर्वच व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापारपेठ बंद झाल्याने शहरातील वर्दळ कमी होऊन सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला.

कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाला बसला. कापड दुकान, स्टेशनरी, हार्डवेअर, सराफ आदी व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांना घरी बेकार बसण्याची वेळ आली आहे. हॉटेल, खानावळ, वडापाव, पानदुकानदार, चहा व रसविक्री करणारे, हातावर पोट असणाऱ्यांना तसेच रस्त्याच्या कडेला बसून माठ विक्री करणारे कुंभार, बूट पॉलिश करणारे गटई कामगार, देवी-देवतांच्या मूर्ती विक्री करणारे कारागीर, फुगे, खेळणी विक्री करणारे, सराफाच्या दुकानांसमोर विणकाम करणाऱ्यांना या कडक निर्बंधाचा फटका बसला आहे. आता खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

"गेली आठ-नऊ महिने आमचे धंदे बंद होते. मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता कुठे सुरळीत धंदे सुरू झाले, पण पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने आमच्यावर दुकान बंद ठेवण्याची सक्ती करण्यात आली. आम्ही कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना करून सलूनचा व्यवसाय करू, पण आम्हाला आमचा धंदा सुरू करण्यास परवानगी द्या."

- अजित चव्हाण, सलून व्यावसायिक खेर्डी

"कोरोना संसर्गामुळे महिनाभर लादलेल्या कडक निर्बंधामुळे आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आमचा व्यवसाय बंद केल्यास खायचे काय, आता शासनाने आमची उपासमारी टाळण्यासाठी रेशनवरील धान्य देण्याची व्यवस्था करावी."

 - सुनील बावदाने, रसविक्रेता चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

SCROLL FOR NEXT