Camellia lizard was found in Kankadi kokan animal marathi news 
कोकण

कनकाडीत आढळला दुर्मिळ कॅमेलियन जातीचा सरडा      

अमित पंडित

 साखरपा  (सिंधुदुर्ग) : कनकाडी इथे कॅमेलीयन जातीचा दुर्मिळ सरडा आढळून आला आहे. अमित पंडित यांच्या काजुच्या बागेत हा सरडा दिसला.  पंडित हे सोमवारी त्यांच्या काजुच्या बागेत गेले असता कॅमेलीयन जातीचा हा अत्यंत दुर्मिळ सारडा त्यांना झाडाच्या फांदीवर दिसून आला. ह्याबाबत पंडित यांनी माहिती दिली. कॅमेलीयन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समाजाला जातो. आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लाब असलेला हा सारडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो.

हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा, रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सारडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. ह्या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढर्‍या काटयांची ओळ दिसून येते. कॅमेलीयन सरड्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा सरडा विषारी आहे, प्राण्यांना चावला तर प्राणी मरतो, माणसांच्या डोक्याला हा चावतो असे समाज असले तरी हे सगळे चुकीचे असल्याचे पंडित यांनी सांगितले. हा सरडा पूर्णत: बिनविषारी असून तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करतो.

#कॅमेलीयन हा दुर्मिळ जातीचा सरडा
#रंग बदलण्यात पटाईत 
#लांबी साधारण सहा इंच 
#बिनविषारी जातीचा सरडा  


संपादन- अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत अंधेरीत मोठी कारवाई

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT