caretaker also became corona positive in guhagar 
कोकण

रत्नागिरीत जामसुत मधील मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; केअर टेकर ही झाला कोरोनाग्रस्त

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) :  तालुक्यातील जामसुत येथे रविवारी मृत्यु झालेल्या व्यक्तिची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्ती यकृताच्या व्याधीने त्रस्त असल्याने मुंबईतून गावी आली होती.  त्या व्यक्तीसोबत केअर टेकर म्हणून काम करणारी आणखी एक व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुहागरातील प्रशासन हादरुन गेले आहे.  या दोघांच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर होम क्वारंन्टाईनचा शिक्का मारुन सोडण्यात आले. 
 
गुहागर तालुक्यातील जामसुतची एक व्यक्ती शुक्रवारी मुंबईहून साध्या रुग्णवाहिकेने गुरुवारी (ता. 7) रात्री जामसुतला आली. या व्यक्तिसोबत मुंबइहून या व्यक्तीचा केअर टेकर आणि भाऊ जामसुतला आले होते. भाऊ खासगी रुग्णवाहिकेने परत मुंबईला गेला. सदर रुग्ण आणि त्याचा केअर टेकर जामसुतला स्वतंत्र घरात रहात होते. जामसुतच्या ग्रामकृतीदलाने या संदर्भातील माहिती आरोग्य विभागाला शुक्रवारी (ता. 8) दिली. आरोग्य विभागाने रुग्ण आणि केअर टेकरला ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे स्वॅब घेण्यासाठी तातडीने बोलावले.  त्यामुळे या दोन व्यक्ती जामसुतमधील खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात स्वॅब देवून परतल्या.  रविवारी सायं. 4 च्या सुमारास सदर रुग्णाचा मृत्यु झाला.


या रुग्णाला यकृताची व्याधी असल्याने ताप येत होता. त्यामुळे स्वॅबचा अहवाल आला नसला तरी आरोग्य विभाग सदर रुग्णाकडे कोरोनाचा संभावित रुग्ण म्हणूनच पहात होते. दोघांनाही होम क्वारंटाईन करुन रुग्णाची काळजी घेणाऱ्यांनाही काळजी घेण्यासंदर्भातील सूचनांची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. त्याची काटकोर अंमलबजावणी केली जात होती. रविवारी सदर रुग्णावर अंत्यसंस्कार करताना पीपीटी किट घालुनच त्याचा देह स्मशानात नेण्यात आला होता.


दरम्यान रुग्ण आणि केअर टेकरच्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी (ता. 12) गुहागरला पोचला. दोघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. रुग्णाचा मृत्यु झाला असला तरी जामसुत गावापासून ३ कि.मी.चा परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. सदर रुग्णाचा केअर टेकर म्हणून काम करत असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला (मुळ गाव पालशेत) कोरोना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृत व्यक्तीची पत्नी मुंबईला रहाते. रुग्णाला सोडण्यासाठी त्यांचा भाऊ मुंबईतून आला होता. या दोन व्यक्तीची माहिती मुंबईला कळविण्यात आली आहे. सदर रुग्णाला घेवून येणाऱ्या जामसुतमधील खासगी वाहन चालक, अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या व्यक्तिंचा स्वॅब घेवून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींच्या संपर्कात अन्य कोणी आले आहेत का याची माहिती प्रशासन घेत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT