case dolphin was once again found on the deer beach in Dapoli 
कोकण

हर्णेतील डॉल्फिनचे गुढ उकलेना ; समुद्रकिनारी पुन्हा एकदा सापडला मृत डॉल्फिन...

सकाळ वृत्तसेवा

हर्णे  (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील हर्णे नवानगर येथे पुन्हा एकदा याच महिन्यात (मे महिन्यात) डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्यामुळे तिसऱ्यांदा हा अशाप्रकारे डॉल्फिन मासा मृत होऊन समुद्रकिनारी सापडणं याच नेमकं कारण वनविभागाने शोधून काढणं गरजेच आहे. वारंवार हे असे डॉल्फिन माशांच्या बाबतीत होत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.


 दापोली तालुक्यातील सालदुरे,पाळंदे येथे समुद्र किनारी गेल्या काही दिवसांपूर्वी एक मृत डॉल्फिन सापडला होता ही बाब ग्रामस्थांनी पत्रकार व वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फिनला समुद्रकिनारी खड्डा करून पुरून टाकले ही घटना ताजी असतानाच रविवारी ३ मे रोजी दुसऱ्या एका डॉल्फिनचा मृतदेह समुद्रातून वाहून येऊन किनार्‍याला पडलेला आढळून आला. एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. या डॉल्फिनला देखील कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच खड्डा काढून पुरला. काही दिवसांपूर्वी गुहागर येथील समुद्र किनारी देखील मृत डॉल्फिन सापडला होता.


 परंतु आता एकाच महिन्यात केवळ २० दिवसांनी पुन्हा एकदा हर्णे नवानगर येथे मृत अवस्थेत डॉल्फिन सापडला. दापोली तालुक्यातली या दोन महिन्यातली मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची ही तिसरी घटना आहे. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. सदरचा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हजर राहून पंचनामा करून ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने तिथेच पुळणीत खड्डा काढून पुरला.


 परंतु हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याचा ठोस शोध लावून डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर आणणे गरजेचे बनले आहे. यावेळी हर्णे परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र - प्रितम साठविलकर, दापोली वनाधिकारी , कर्मचारी - श्रीम.जगदाळे मॅडम, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT