कोकण

नवाबागमध्ये पकडलेल्या ट्रॉलरवर आज खटला भरणार

दिपेश परब

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा मूठ येथील समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना नवाबाग येथील मिनी पर्ससीन ट्रॉलर शुक्रवारी येथील स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिला. अशाच प्रकारे अनेक ट्रॉलर वारंवार अनधिकृत मासेमारी करत असून याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 नुसार आज वेंगुर्ले तहसीलदारांकडे पुढील कारवाईसाठी खटला दाखल करण्यात येणार आहे. 

तालुक्‍यातील नवाबाग येथील आयएनडी मिनी पर्ससीन ट्रॉलर (एम.एच.5 एम. एम 3700) येथील उभादांडा मूठ येथील सुमारे तीन वाव समुद्रात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अनधिकृत मासेमारी करताना येथील स्थानिक पारंपरिक मच्छीमार व गिरप रापण संघाने पकडून मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे. याबरोबर मासेमारी करणारी जाळीसुद्धा त्यांनी ताब्यात घेतली. यावेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक पारंपरिक मच्छीमार एकवटले होते. यावेळी वेंगुर्ले पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. 

स्थानिक मच्छीमार व गिरप रापण संघाने पकडलेली मिनी पर्ससीन मत्स्य विभागाने ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला आहे. गेले अनेक दिवस मिनी पर्सनेट मच्छीमार पारंपरिक मच्छीमार यांच्या क्षेत्रात येऊन मासेमारी करत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांना मासे मिळत नाहीत. यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने सध्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप यावेळी स्थानिक मच्छीमार हेमंत गिरप यांनी केला. 

आपल्याकडे गस्ती नौका नसल्याने जी कारवाई आम्हाला किनाऱ्यावरून शक्‍य होते ती आम्ही करतो.
- चिन्मय जोशी, वेंगुर्ले मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT