The cemetery at Ubhandanda was attacked in two groups today 
कोकण

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहचले अन् अग्नी देणार तेव्हढ्यात सुरु झाली हाणामारी... 

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - तालुक्यातील उभादांडा येथे स्मशानभुमीच्या वादावरून दोन गटात आज सकाळी ८ च्या सुमारास दांड्या, कोयत्याने तुफान हाणामारी झाली. यात एका गटातील २ गंभीर दुखापत तर दुसऱ्या गटातील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.ही हाणामारी सुरू झाली तेव्हा एका वृध्द महिलेच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार सुरू होते. 

 याबाबत वेंगुर्ला पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर येथील एका  वृद्ध महिलेचा मृतदेह जाळत असतानाच ही हाणामारी झाल्याने याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

येथील या दोन गटात पूर्वीपासून सार्वजनिक स्मशानभूमी व जुन्या पायवाटेवारून वाद सुरू आहेत. दरम्यान आज येथील एक वृद्ध महिलेचा मृत्य झाल्यानंतर तिला त्याठिकाणी स्मशानभूमीत घेऊन गेले असता तिला अग्नी देतानाच हा हाणामारीचा प्रकार घडला. दुसऱ्या गटातील तीन व्यक्तींनी येत याठिकाणी कोयत्याने हाणामारी करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत वेंगुर्ला पोलिसात तक्रार दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिव-शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT