challenge on BJP with shiv sena party in pawas ratnagiri for grampanahyat election 
कोकण

आता सामना रंगणार ; सेनेवर मात करण्याचे भाजपसमोर तगडे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : पावस जिल्हा परिषद गटातील नाखरे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना व गाव पॅनेल यांच्यात लढत होणार आहे. सेनेच्या दोन जागा बिनविरोध झाल्याने विजय रथाच्या चौथ्या पर्वाला सुरवात झाली आहे. त्यांच्याविरोधात गाव पॅनेलने सात उमेदवार उभे केल्याने रिंगणात १४ उमेदवार उरले आहेत. त्यामुळे सेना व गावपॅनेल यांच्यात सामना होणार आहे.
या गावांमध्ये गेली १५ वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे.

पाच वर्षात सात कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झाल्याने पाच वर्षाचा खर्च अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक मतदाराला पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा, पत्रकांच्या माध्यमातून दिला जात आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून भाजपचे माजी आमदार बाळ माने व माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे यांनी प्रचारात उतरून गावामध्ये परिवर्तन करण्याच्यादृष्टीने संपर्क दौरा केला आहे. गेल्या तीन पर्वात विविध विकासकामांच्या व योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मागणीनुसार कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे प्रचारातून सांगण्यात येत आहे. शिवसेना पॅनेलच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा पत्रकाद्वारे ग्रामस्थांसमोर ठेवला जात आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुविधा करणे, बचत गट महिला नागरी सुविधा केंद्र उभारणे, विकेल ते पिकेल या योजनेतून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करणे, नाखरे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, मोबाईल नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी टॉवर उभारणीचा प्रयत्न, शेतकरी सक्षमीकरणासाठी कृषी विषयक योजना अंमलबजावणीवर भर देणे, नळपाणी, रस्ते, पाखाड्या स्मशानशेड, पिकअप शेड आदी सुविधा गावात सर्वत्र उपलब्ध करण्याचे आश्‍वासन प्रचार फेऱ्यातून दिले जात आहे. मतदार उर्वरित सात जागा निवडून देऊन निवडणुकीत सेनेचा विजय होईल, असा दावा सरपंच विजय चव्हाण यांनी केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT