Chance of heavy rain Kokan for three days 
कोकण

तीन दिवस कोकणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

राजेश कळंबटे

रत्नागिरी : सलग तिसर्‍या दिवशी रत्नागिरीकरांचा दिवस ढगाळ वातावरणातच सरला. हवेत वाढलेल्या उष्मामुळे सोमवारी (ता. 4) पहाटे रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुपारपर्यंत वातावरण ढगाळच होते. 7 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे बागायतदार अडचणीत सापडले आहेत.

हवामान विभागाकडून 4, 5 आणि 6 जानेवारीला दक्षिण कोकणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात वेगाने बदल होत आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील तिन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 

गेले दोन दिवस पावसाला पुरक परिस्थिती होती. गेले आठ दिवस जिल्ह्यात पारा खाली घसरला होता. सगळीकडेच थंडा थंडा कुल कुल असे वातावरण होते. त्यात बदल झाला आणि थंडी ऐवजी पुन्हा उष्मा वाढला. सोमवारी पहाटेला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाचा शिडकावा झाला. ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सकाळी थंडी गायब झाली. सोमवारी सुर्यदर्शनच झाले नाही. पुन्हा आभाळ भरुन आल्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता होती. परंतु दुपारनंतर उन पडले आणि सर्वांनीच निःश्‍वास सोडला. 

दमट हवामानामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवल्या.
याबाबत पावस येथील आंबा बागायतदार आनंद देसाई म्हणाले की, रत्नागिरीत पडलेल्या या अवकाळी पावसाचा परिणाम लगेचच आंबा पिकावर होईल असे नाही; मात्र सलग दोन ते तीन दिवस असाच पाऊस पडत राहीला तर आंब्यावर तुडतुडा, अ‍ॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव होईल. मोहोर किंवा फळावर डाग वाढत राहील तर ती गळून जाण्याची शक्यता आहे. फळ मोठे असेल तर त्याच्या दर्जावर परिणाम होतो. या परिस्थिती बागयतदारांना फवारणीचा हात वाढवावा लागणार आहे. त्यामुळे खर्चात वाढ अशी भिती व्यक्त केली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT