chandgad Police beat up
chandgad Police beat up 
कोकण

परवाना असूनही चंदगड पोलिसांची अशी क्रुरता

सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - येथील भाजी व्यापारी संजय जाधव यांना पहाटे दोनच्या दरम्यान शिरगाव फाट्यावर चंदगड पोलिसांकडून नाहक बेदम मारहाण करण्यात आली. जाधव यांच्यासोबत चालक बाळू खांबल होते. त्यांचा वाहन परवाना होता. गाडीची सर्व कागदपत्रे पूर्ण होती आणि भाजीपाला वाहतुकीचा प्रशासनाने दिलेला वैध ई पासही होता. तरीही त्यांना अडवून ड्युटीवर असलेल्या चारपैकी एका पोलिसाने त्यांना दांडा फुटेपर्यंत मारहाण केली. जवळपास दोन तास त्यांना मारहाण करत अडवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या मारहाणीचा दोडामार्गवासीयांनी निषेध केला आहे. 

याबाबत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉक डाऊनमुळे अत्यावश्‍यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रशासनाने ई-पास दिले आहेत. भाजीपाला वाहतूक अत्यावश्‍यक सेवा आहे. त्यासाठीचा ई पास श्री. जाधव यांनी काढला होता. त्यांनी गडहिंग्लज सीमेवर कर्नाटकमधून आलेली भाजी आपल्या मिनी टेम्पोत भरली आणि ते दोडामार्गकडे यायला निघाले. शिरगाव फाट्यावर चार पोलिस होते. त्यांच्या मागणीनुसार त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवली. त्यातील एकाने उलटसुलट प्रश्‍न विचारत शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर जाधव यांना मारहाणही केली. त्यांनी पाणी मागितले तर त्यांना पाणी देण्याचे सौजन्यही चौघांपैकी एकानेही दाखवले नाही.

मारहाण आणि शिवीगाळ मात्र एकच पोलिस करत होता. त्यासंदर्भात जाधव यांनी दोडामार्ग पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिस निरीक्षक सुनील थोपटे बाहेर गेले होते. दरम्यान, पोलिसांच्या त्या कृतीबद्दल तालुक्‍यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लॉक डाऊन तोडून कुणी मजेसाठी फिरत असेल तर कारवाईचे समर्थन एकवेळ करता येईल; पण अत्यावश्‍यक सेवेत असणाऱ्या आणि नियमानुसार वागणाऱ्याला अशी बेदम मारहाण होत असेल तर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी, ती झाली नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

चौकशीचे आश्‍वासन 
याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी चंदगड पोलिस निरीक्षक ए. एन. सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराची काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करुन दोषी आढळल्यास पोलिसावर कारवाई करण्याची ग्वाही दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूच्या फलंदाजांचा आक्रमक अंदाज, चेन्नईसमोर ठेवलं 219 धावांचं लक्ष्य

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

SCROLL FOR NEXT