कोकण

प्रतिसादाअभावी शिवशाहीचे तिकीट झाले कमी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - एसटी महामंडळाने शिवशाही स्लीपर सेवेचे तिकीट १२ फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून कमी केले आहेत. रत्नागिरीतून सुटणाऱ्या मुुंबई, पुण्याकडील गाड्यांचे तिकीट दर १८० ते २४० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. 

अप्रशिक्षित चालक आणि महामंडळाचा वाहक यांच्यातील समन्वयाचा अभाव, सातत्याने होणारे अपघात, सदोष सेवा यामुळे शिवशाहीला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत होता. रत्नागिरीतील सहा फेऱ्यांचे दर कमी केले आहेत. रत्नागिरी-मुंबई तिकीट ९५५ वरुन ७१५ रुपये इतके झाले आहे.

२४० रुपयांनी प्रवास स्वस्त झाला आहे. संगमेश्वर- मुंबई फेरीचा दर ८३० वरून ६३० रुपये झाला असून २१० रुपये सूट मिळणार आहे. चिपळूण- मुंबईचा दर ७१५ वरून ५३५ रुपये केला असून १८० रुपये सूट मिळेल. रत्नागिरी-निगडीचे ९१० वरून ६८० रुपये झाले आहे. पाली- निगडी मार्गाचा दर ८४५ वरून ६३० रुपये केला असून २१५ रुपये सूट मिळणार आहे. साखरपा- निगडी मार्गावरील ७६५ रुपये तिकीट ५७० रुपये झाले आहे. 

सुटीत फायदा
सुटीच्या काळामध्ये अजूनही खासगी बससेमधून प्रवास करणाऱ्यांना चाट बसते; मात्र ग्राहकांचा तिकडे ओढा सर्वाधिक असतो. हे लक्षात घेऊनच शिवशाही बसेसचे कमी केलेले दर सुटीच्या हंगामात प्रवाशांसाठी किफायतशीर ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT