KOKAN SAKAL
कोकण

स्वस्तातील चिनी यंत्रणा सुरक्षेच्या मुळावर

सागरी सुरक्षेचा प्रश्न ;देवगड पोलिसांकडून तपास सुरू

- राजेश शेळके

रत्नागिरी : भारतीय बनावटीची महागडी ऑटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम (एआयएस) न बसवता स्वस्तातली चिनी बनावटीची यंत्रणा बसवुन त्याची नोंद रत्नागिरीतील मच्छीमाराने न केल्याने देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. ट्रॅकिंग केल्यानंतर या नौकेचे मूळ चायना रजिस्ट्रेशन दिसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलिस आणि मत्स्य विभागाने देवगडमध्ये या नौकेवर कारवाई केली. देवगड पोलिस याचा अधिक तपास करत असून येथील सहायक मत्स्य आयुक्त विभागाकडुनही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

स्वस्त म्हणून चिनी बनावटीची यंत्रणा बसवणे रत्नागिरीतील दाऊद इब्राहिम साखरकर याना महागात पडले.देवगड (जि. सिंधुदुर्ग) समुद्र किनारी मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या नौकेवर चिनी बनावटीची ऑटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम आढळुन आल्याने यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. चौकशीसाठी ही बोट ताब्यात घेण्यात आली, तेव्हा ती रत्नागिरीतील दाऊद इब्राहिम साखरकर यांची असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय बनावटीची सिस्टिम ७५ हजाराची आणि महागडी आहे. मात्र चिनी बनावटीची सिस्टिम स्वस्तातली म्हणजे २५ हजाराची आहे. त्यांनी अधिकृत एजन्सीकडुन एआयएस यंत्रणा बसवून घेतली, तेव्हा त्याचे भारतीय रजिस्ट्रेशन करून घेतले नाही.

ट्रॅकिंगमध्ये चिनी रजिस्टेशनची बोट राज्याच्या सागरी हद्दीमध्ये आल्याने सर्व सतर्क झाले. या बोटीचा शोध घेऊन देवगड पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांकडुन चौकशी केली असता नौका नाही, तर एआयएस सिस्टिम चिनी बनावटीची असल्याचे पुढे आले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वःस सोडला.

''मासेमारी, जलवाहतुक करणाऱ्या प्रत्येक नौका, जहाज आदींनी ऑटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम (एआयएस) किंवा अन्य यंत्रणेची नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ट्रॅकिंग केल्यास संबंधित मच्छीमारी नौका किंवा जहाजाची माहिती मिळते. मात्र या नौकेची नोंद नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने आम्ही नौका चालकावर योग्य ती कारवाई करू. ''

-एम. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्त

पॉइंटर

  1. स्वस्त यंत्रणा बसवणे पडले महागात

  2. नोंद न केल्याने गोंधळात पडली भरच

  3. मत्स्य आयुक्त विभागही करणार कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT