checking of water policy CEO go and check from home to home in chiplun ratnagiri 
कोकण

ग्रामस्थ झाले चकित अन् अधिकारी झाले घामाघूम ; सीईओ पोहोचल्या थेट वाडीच्या घरात

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : सरकारी पाणीयोजना अपयशी म्हणून अपांगे वाडीने स्वतः बनवलेली खासगी पाणीयोजना उत्तम चालते, मग सरकारी योजना का अपयशी ठरतात याचा अभ्यास करा, तशा छोट्या योजना गावागावांत राबवा. मोठ्यांना फाटा द्या, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या. वाडीवाडीत घराघरांत फिरून त्यांनी लाभार्थींकडून माहिती घेतल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना घाम फुटायचीच वेळ आली होती.

डॉ. जाखड यांनी कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी आकस्मिक भेट दिली. तेथील अपांगे वाडीला पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी खासगी योजना केल्याचे एका वाडीतील ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा ती योजना प्रत्यक्ष जाऊन सीईओंनी पाहिली. त्यासाठी घरोघरी फिरल्या. योजना कशी राबवली याची माहिती घेतली. इंजिनिअर कोण होते विचारता, सारे गावकऱ्यांनीच केल्याचे सांगितले तेव्हा सीईओंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामस्थ योजना यशस्वी करतात तर तुमच्या का होत नाहीत? असा सवाल केला.

डॉ. जाखड स्व. निकम यांच्या जयंतीनिमित्त आल्या. तेथून त्या कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी दाखल झाल्या. सोबत बीडीओ राऊत आणि पाणीपुरवठा अधिकारी होते. पाइप जागेवर नाहीत, टाकी आहे की नाही, असेल तर कुठे आहे याचा शोध घेतला. पिण्यासाठी आता व्यवस्था काय विचारता अधिकारी निरुत्तर झाले. यावर दोषींवर कारवाई होईल; मात्र लोकांना 
नियमित पाणी मिळणे महत्वाचे आहे, असे सुनावले.

घराघरांत फिरून माहिती घेतली

सीईओंनी घरकुल, गरोदरमाता तसेच अन्य योजनांची माहिती त्या त्या ठिकाणी जाऊन घेतली. प्रत्यक्षात सीईओच चौकशी करत असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले होते. सीईओ मधलीवाडी, डिकेवडी, गुजरवाडीला चालत पोचल्या. घराघरांत जाऊन महिलांशी चर्चा केली. चार तास त्यांनी गावात फिरून रस्ता, पाणी आणि अन्य योजनांची माहिती घेतली. अधिकारी आणि ग्रामस्थही हे सारे बघून चकित झाले. घाणेकरवाडी, डिकेवडी, वाडेकरवाडी, गोताडवडी, निचोरवाडी या वाड्यांचा योजनेसाठी तत्काळ प्रस्ताव देण्याची सूचना केली.

दृष्टिक्षेपात...

  •  चार वाड्यांतून 
  • चार तास पायपीट
  •  घराघरांत जाऊन लाभार्थ्यांशी संवाद
  •  पाणीयोजनेचे 
  • पाइप जागेवर नाहीत
  •  टाकी शोधायची कुठे?

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार

Karnataka Politics : ठरलं...! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले...

प्रेमाची गोष्ट 2 मध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम घालणार धुमाकूळ ! रिलीजपूर्वीच जोडीची चर्चा

India Afghanistan relations: अफगाणिस्तानातील भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT