Chemical water Water released from Gadandi dam into Jambhi river in ratnagiri 
कोकण

त्याने बिनधास्तपणे नदीत सोडले रसायनमिश्रित पाणी अन्.....

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी)  : तालुक्यातील जांभी तसेच गडनदीत घातक रसायन टाकण्यात आल्याने पांढर्‍याशुभ्र रंगाचे पाणी नदीतून वाहत होते. या प्रकरणी अज्ञाताविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रसायनमिश्रित पाणी वाहून जाण्यासाठी गडनदी धरणातून पाणी सोडण्यात आले. तरीही नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान, पाणीप्रश्‍नामुळे कुशिवडे सरपंचांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीसह तहसीलदारांकडे केली आहे. तालुक्यातील कोसबी, फुरूस, येगाव येथून वाहणार्‍या जांभी नदीत अज्ञातांकडून टँकरमधून घातक रसायन टाकण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून नदीतील पाणी पांढरेशुभ्र झाले. नदीकाठी उग्र वासही येत आहे. याची दखल घेत तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागांनी खबरदारी घेत पाणी उपसा बंद केले. आरोग्यच्या कर्मचार्‍यांनी दूषित पाण्याचे नमुने रत्नागिरी येथे तपासणीला दिले आहेत.

सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी नदीकाठी धाव घेत पाहणी केली. आमदार शेखर निकम यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. दूषित पाणी वाहून जाण्यासाठी गडनदी धरणातून पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. टँकरच्या माध्यमातून कोणी रसायन टाकले असावे, याची चर्चा खुबीने येगाव, कुटरे, कुशिवडे पंचक्रोशीत आहे. नदीत रसायन टाकणार्‍या टँकरचालक मालकाचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सीसीटीव्ही फूटेज तपासा

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने कुशिवडेचे सरपंच सिद्धार्थ कदम यांनी पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयास टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. बिनधास्तपणे नदीत घातक रसायन टाकल्याने हजारो मासे मृत पावले आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून पोलिसांनी सूत्रधाराचा शोध घ्यावा, शक्य तितक्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT