mahad midc
mahad midc 
कोकण

महाड- रोहन केमिकलला भिषण आग, उत्पादनाबाबत संशय

सुनील पाटकर

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील रोहन केमिकल या कारखान्याला आज सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. यामध्ये कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, आगीमुळे जीते व परिसरातील ग्रामस्थांना डोळे चुरचरण्याच्या त्रास सहन करावा लागला. या कारखान्यात कशाचे उत्पादन घेतले जात होते याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. 

महाड औदयोगिक क्षेत्रात मागील महिन्यात प्रिव्ही ऑरगॅनिक या कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आता रोहन केमिकलही आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. जीते गावाशेजारी असणाऱ्या या कंपनीला सकाळी अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी  कंपनीमध्ये साधे अग्निशमन यंत्रही नव्हते. त्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. यात संपूर्ण प्लँट जळून खाक झाला. याच दरम्यान समोर असणाऱया टायटन केमिकलमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दोन आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले. सीइटीपी व मार्गाचे पथक याठिकाणी रवाना झाले आणि आग विझविण्याचा प्रयत्न वेगाने सुरू झाला. दुपारी तीन च्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आगीमुळे ब्रोमीन हा वायू बाहेर पडू लागल्याने येथे असणाऱ्या नागरिकांना व जीते ग्रामस्थांना डोळे चुरचुरण्याचा त्रास सुरू झाला. 
प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार व पोलीस निरिक्षक आबासाहेब पाटिल यंत्रणेसह येथे दाखल झाले. त्यांच्याकडून जीते ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आली. एमआयडीसीतील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असून वारंवार ग्रामस्थांना स्थलांतरीत व्हावे लागते याबाबत येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

यापूर्वी रोहन केमिकल हा कारखाना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमुळे चांगलाच प्रकाशझोतात आला होता. हा कारखाना कागदोपत्री बंद असल्याचे सांगितले जात असले तरीही पाच कामगारांच्या मदतीने या कारखान्यात कोणते उत्पदान घेतले जात होते हे मात्र गुलदस्त्यात आहे. येथील उत्पादनाबाबत व आगीच्या कारणाबाबत माहिती देण्यासाठी कंपनीमध्ये कोणताही सक्षम अधिकारी येथे नव्हता. कंपनीला लागलेली आग व कंपनीच्या आवारात कोणकोणते रसायन आहे या बाबतची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी दिले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT