Chief Minister Uddhav Thackeray Visits Shivr Rajeshwar Temple On Sindhudurg Fort 
कोकण

मुख्यमंत्री ठाकरेंची शिवराजेश्‍वर मंदिरास भेट 

सकाळ वृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी किल्ले सिंधुदुर्गवर जात शिवराजेश्‍वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मानाचा जिरेटोप व पुष्पहार श्री. ठाकरेंच्या हस्ते छत्रपतींना अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आई भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली. 

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे मालवणात बोर्डिंग मैदान येथे शिवसेनेच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी बोर्डिंग मैदानालगतच्या सीताबाई श्रीपाद घुर्ये नर्सरीतील चिमुकल्या मुलांसोबत छायाचित्र काढले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चिमुकल्यांसह त्यांचे पालकही आनंदी झाले. त्यानंतर श्री. ठाकरे बंदर जेटीवरून आकर्षकरीत्या सजविलेल्या होडीतून किल्ले सिंधुदुर्गवर रवाना झाले.

किल्ला प्रवेशद्‌वारावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, हर्षद गावडे, शैलेश भोगले, मंदार गावडे, वायरी भुतनाथ सरपंच भाई ढोके, अन्य ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण रेवंडकर, मंगेश सावंत आदी उपस्थित होते. 

सुरक्षेसाठी खबरदारी 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बोर्डिंग मैदान ते फोवकांडा पिंपळ, जेटी, किल्ले सिंधुदुर्गवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटकांसाठी किल्ले दर्शन तसेच जेटीसह किल्ल्यावरील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री किल्ले दर्शन करून माघारी परतल्यानंतर पर्यटकांसाठी किल्ले दर्शन सुविधा सुरू करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT