children's park 74 lakh fund kankavli sindhudurg
children's park 74 lakh fund kankavli sindhudurg 
कोकण

कणकवली बालोद्यानसाठी 75 लाखाचा निधी

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील श्रीधर नाईक बालोद्यानाच्या सुशोभिकरणासाठी 75 लाखांचा निधी तसेच भालचंद्र महाराज आश्रमासाठी 50 लाखाचा निधी, असा सुमारे एक कोटी पेक्षा अधिक निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरासाठी दिला आहे. अद्ययावत अशा अग्निशमन विभागाची ही मागणी आम्ही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परुळेकर, सुजित जाधव, महिला अध्यक्ष नीलम पालव आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, जिल्हा नियोजनाचा 170 कोटीचा आराखडा नुकताच मंजूर झाला. यावेळी आम्ही बालोद्यानासाठी निधीची मागणी केली होती. याचबरोबर भालचंद्र महाराज आश्रम लगतच्या भूमिगत वीज महिन्यांसाठी साडेसात लाख रुपये वेगळा निधी दिला आहे. तसेच मंडपाचे आता काम सुरू झाले आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना आणि महाविकासआघाडी कटिबद्ध आहे. आम्ही जो जनतेला शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार आहोत.

क्रीडांगणाच्या आरक्षणासाठी ही पालकमंत्र्यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शहराच्या विकासाची कामे ही शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत. शहरासाठी सहा कोटीचा निधी हा भूमिगत वीज महिन्यांसाठी मंजूर झाला होता. मात्र, हा निधी आता मागे गेला आहे. याचे कारण सत्ताधारी मंडळींना कोणतेही व्हीजन नाही केवळ भ्रष्टाचार डोक्‍यात असल्यामुळे विकास निधी मागे जात आहे. शहरासाठी हा भूमिगत विज वाहिन्यांचा प्रकल्प पुन्हा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हा निधी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भूमिगत वीजवाहिन्या साठी मिळावा अशी मागणी आम्ही वीज मंत्र्यांकडे केली आहे.

कणकवली शहराच्या विकासासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. पारकर यांनी यावेळी दिली. भालचंद्र महाराज प्राथमिक शाळेची जागा आश्रम संस्थेला देवून दुसऱ्या जागेत शाळा इमारत बांधकामासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असून त्याचा पाठपुरावा करीत आहोत. 

भाजी मार्केटची इमारत 
नगरपंचायतीने विकसीत करावी 

भाजी मार्केटची इमारत नगरपंचायतीने विकसित करावी ही भूमिका कायम आहे. खासगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला 3 वर्षाची दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भूमिका आहे. नगरपंचायत आणि विकासकातील करार वगळून इमारत बांधकाम होत नाही आहे. चुकीचे अनधिकृत बांधकाम तोडून सदर जागेत नगरपंचायतीने भाजी मार्केट इमारत बांधावी असा पुनरुच्चार पारकर यांनी केला. 3 डिसेंबर 2020 रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. त्यानुसार नगरसंचालक याना मंत्री शिंदे यांनी निर्देश दिल्यानुसार या चौकशीकामी नगगरचना विभागाचे असिस्टंट डायरेक्‍टर मिलिंद आव्हाडे यांची स्वतंत्र कमिटी नेमली असून येत्या काही दिवसांत याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहोत, अशी माहिती पारकर यांनी दिली.  

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT