chipi airport sakal media
कोकण

Chipi Airport : कोल्ह्यामुळे विमानाच्या घिरट्या

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर कोल्हा आल्याने दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालाव्या लागल्या

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर कोल्हा आल्याने दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालाव्या लागल्या. हा प्रकार पायलटच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला त्या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. त्या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले.याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचे टोळके आहे. हे कोल्हे भक्ष्यासाठी फिरत असतात. विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला. या विमानतळावर मुंबईवरून विमान येत होते.

यावेळी विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पायलटने ते विमान धावपट्टीवर न उतरता पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले. तत्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले.

या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले. त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले. याची चर्चा प्रवाशांमध्ये चांगलीच रंगली होती. या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतीने बंदिस्त केल्या आहेत, तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT