कोकण

शिंदे शैलीत कॉंग्रेसमधील गटबाजीला दणका? चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांत धुमशान!

मुझ्झफर खान

चिपळूण (रत्नागिरी): चिपळुणातील (Chiplun)राष्ट्रीय कॉंग्रेसमधील गटबाजीच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्याकडे गेल्या असून यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना रत्नागिरी (Ratnagiri)जिल्हा कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे (Manoj shinde)यांना केल्या आहेत. त्यामुळे मनोज शिंदे लवकरच जिल्ह्यात मोठी बैठक घेऊन वादावर तोडगा काढणार आहेत. मात्र, पक्षात राहून गटबाजी करण्यावर मनोज शिंदे त्यांच्या शैलीत कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Chiplun-Congress-hold-a-meeting-on-factionalism-kokan-political-marathi-news

सध्याच्या स्थितीला येथील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धुमशान सुरू झाले आहे. कोरोनाच्या कालावधीतही कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरोधात तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांना या विषयाकडे लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना केल्या आहेत.

नेहमीच दोन गट

चिपळुणात कॉंग्रेसमध्ये नेहमीच दोन गट राहिले आहेत. पक्षात दाखल होणारे नवे पदाधिकारी आणि जुन्यांचे फारसे पटलेले नाही. प्रदेशाध्यक्षांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रभारी मनोज शिंदे हे चिपळुणातील गटबाजीवर बैठक घेणार आहेत. मुद्दामहून गटबाजी करणांनाही ते शिंदे स्टाईलने डोस देणार असल्याचे समजते. बैठकीबाबत प्रभारी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

नेहमीच तक्रारीचा सूर

माजी मुख्यमंत्री नारायण राणे देखील कॉंग्रेसमध्ये असताना हीच स्थिती होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नेहमीच तक्रारीचा सूर उमटला आहे. स्वतः काही करायचे नाही. आणि करणाऱ्याच्या पायात साप सोडून त्याची गंसत पहायची ही वृत्ती कॉंग्रेसला घातक ठरत आहे. त्यामुळे शहर वगळता तालुक्‍यात कॉंग्रेसला ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालेले नाही. चमकोगिरी पुढाऱ्यांमध्ये पक्षाची नाळ जनसामान्यांबरोबर जुळलेली नाही. त्यामुळेच नेहमी तक्रारींचा सिलसीला सुरू राहिला आहे.

Chiplun-Congress-hold-a-meeting-on-factionalism-kokan-political-marathi-news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT