Leopard sakal
कोकण

चिपळूण : पोफळी परिसरात बिबट्याचे दर्शन

शिकारीच्या शोधात मानवीवस्तीकडे, बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : एप्रिलमध्ये जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भ्रमंती सुरू झाली आहे. पोफळी परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे.पोफळी, अलोरे, कोळकेवाडी, कुंभार्ली, तळसर, मुंढे या परिसरात बिबट्यासह इतर प्राण्यांचे दिवसा तर कधी सांयकाळी दर्शन होत आहे. कुंभार्ली घाटातून प्रवास करताना सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे या मार्गावरून प्रवास करणारे मुश्ताक चौगुले यांनी सांगितले. पाळीव जनावरांवर तसेच मनुष्यावर या हिंस्त्र प्राण्याकडून कधी हल्ला होईल, याची शाश्वती नसल्याने नागरिकांकडून भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी अलोरे, पोफळी पवारवाडी, धनगरवाडी येथे बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला होता.

सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत. याचाच परिणाम म्हणून बिबटे व इतर प्राणी पाण्याच्या शोधात मानवीवस्ती लगतच्या पाणवठ्यावर येत आहेत.

कोयनेच्या जंगलासह कुंभार्ली घाटात अधिवास..

कोयनेच्या जंगलात आणि कुंभार्ली घाट परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत अद्यापही अधिकृत आकडा जाहीर नसला तरी जिल्ह्यात बिबट्याकडून होणारे हल्ले आणि त्यांचे वारंवार घडणारे दर्शन यातून ते ठळक होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जंगली प्राणी पाण्याच्या शोधात आपल्या नैसर्गिक अधिवासातून दुसरीकडे भ्रमंती करतात.

वनविभाग केवळ आपल्या अत्खत्यारित असलेल्या जंगलातच पाणवठे स्वच्छ करण्याचे उपक्रम हाती घेत आहे. मात्र, खासगी जंगलातील पाणवठे नष्ट होत चालल्याने या दिवसात जंगली प्राण्याचे पाण्यावाचून हाल होतात. त्यासाठीही वनविभागाकडून पाऊले उचलण्याची गरज आहे.

- पंकज कदम, अलोरे

जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने या दिवसात जंगली प्राणी वस्तीनजीक दिसून येतात. त्यातून प्राण्याची शिकर होते. सध्या बिबट्याचे होणारे दर्शन हा त्याचाच एक भाग आहे. पाण्यासाठी जंगलातील पाणवठे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

- सदफ कडवेकर, प्राणीमित्र, पोफळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT