jail sakal
कोकण

चिपळूण : सुनेला मारणाऱ्या सासूला आजन्म कारावास

वालोपे देऊळवाडीतील प्रकार; भांडणात केले होते ३६ वार

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : सुनेवर छाती आणि पोटात सुरीने सपासप वार करून तिला ठार मारल्याप्रकरणी सासूला चिपळूण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथे ही घटना २९ एप्रिल २०१७ मध्ये घडली होती. परी प्रशांत करकाळे (वय २५) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. आरोपी सासू रेणुका नामदेव करकाळे (५५) हिला शिक्षा ठोठावली. या घटनेत दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली.

परी यांचा २०१२ च्या सुमारास प्रशांत करकाळेसोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर घरात कौटुंबिक वाद सुरू झाले. सासू-सुनेमध्ये सतत वाद होत असत. परी करकाळे यांना २०१७ मध्ये दोन मुले होती. घरातील सासू व सुनेतील वाद मिटण्यासाठी वारंवार बैठका झाल्या तरी वाद थांबले नाहीत. २९ एप्रिल २०१७ ला रेणुका नामदेव करकाळे आणि परी प्रशांत करकाळे यांच्यातील वाद विकोपाला गेला. सकाळी साडेनऊच्या सुमारास रेणुका करकाळे हिने सुरीने सून परी हिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. छातीत तसेच पोटात तब्बल ३६ वार करीत तिला भोसकून ठार मारले. आईला आपली आजी मारत असल्याने पाहून ही माहिती तीन वर्षीय मुलाने शेजाऱ्यांना सांगितली. शेजारी घरी आले तेव्हा परी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

या घटनेची माहिती वालोपेचे पोलिसपाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी दिली होती. त्यानुसार रेणुका नामदेव करकाळे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल विनायक मधुकर चव्हाण, वेदा संतोष मोरे यांनी वेगाने तपास केला होता. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. २९) या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. या घटनेत एकूण १५ सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये स्मिता शैलेंद्र मयेकर व अजय कदम या दोघांची साक्ष खूप महत्त्वाची ठरली आहे. सरकारी वकील म्हणून पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी रेणुका करकाळे हिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या सोबतच १० हजारांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT