chiplun municipal meeting chai fraud kokan marathi news 
कोकण

रत्नागिरीत २२ लाखांच्या खुर्ची घोटाळ्याचा पर्दाफाश...

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणात खुर्ची घोटाळा झाल्याचे आज गुरुवारी झालेल्या विशेष सभेत उघडकीस आले. ते प्रशासनाने मान्यही केले. केंद्राच्या अन्य कामामध्ये देखील अनियमितता आणि वाढीव खर्च झाल्याचे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहासमोर आणले. याविषयाची संपूर्ण चौकशी महिन्याभरात पूर्ण करावी. तांत्रिक आणि कायदेशीर बाबी देखील महिन्याभरात पूर्ण करून उद्‌घाटनाचा मुहूर्त काढावा, असा ठराव महाविकास आघाडीने मांडला.

२२ लाखाचा घोटाळा
चौकशी ८ दिवसांत पूर्ण करावी. त्यात सर्व अधिकारी आणि नगरसेवकांची देखील चौकशी व्हावी. अशी उपसूचना भाजपकडून मांडण्यात आली. यावेळी ठरावाच्या बाजूने २१ मते तर उपसूचनेच्या बाजूने ५ मते पडली. त्यामुळे उपसूचना फेटाळण्यात आली. विशेष सभा सुरू होताच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार शाब्दिक हल्ला करण्यास सुरुवात केली. सेनेचे शशिकांत मोदी यांनी सांस्कृतिक केंद्रात बसवण्यात आलेल्या खुर्च्या या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या खुर्च्या नाहीत, तर दुय्यम दर्जाच्या खुर्च्या असून संबंधित ठेकेदाराने पालिकेची फार मोठी फसवणूक केली आहे.

ठेकेदाराने पालिकेची  केली फसवणूक

एक खुर्ची ८ हजार रुपये प्रमाणे खरेदी करण्यात आली त्या खुर्चीची मूळ किंमत फक्त ३ हजार ७०० रुपये आहे. हे पुराव्यासह सभागृहात दाखवून दिले. अंदाजपत्रकात जी खुर्ची आहे ती बसवलीच नाही. आशा प्रकारे सुमारे २२ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. नगराध्यक्षा खेराडे यांनीही असा घोटाळा झाला असेल तर सहन करणार नाही. वेळ पडली तर खुर्च्या काढायला लागल्या तरी तेही करेन असे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. विधाते यांनी ही बाब वेळीच सभागृहासमोर आणायला पाहिजे होती. प्रशासनाकडून ही चूक झाली आहे, ते आम्ही मान्य करतो. या बाबत सभागृह जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले.

हेही वाचा- Coronaviras: इराणमध्ये अडकलेल्या या 9 युवकांना भारतात येण्याची लागली आस....

कारणीभूत प्रशासन, ठेकेदार 
खुर्ची घोटाळा उघड होताच सेना गटनेते उमेश सकपाळ म्हणाले, अशा अनेक चुका या कामात प्रशासनाने केल्या आहेत. अधिकार नसताना बांधकाम अभियंता बिले तयार करतात. निविदा प्रक्रियेत अनिमियता झाली. वाढीव कामे परस्पर झाली आहेत. हे सर्व प्रशासनाच्या चुकीमुळे झाले असताना बदनामी मात्र महाविकास आघाडीची केली जात आहे. महाविकास आघाडी शिवसेना सांस्कृतिक केंद्राला विरोध करत आहे असे चित्र लोकांसमोर तयार केले गेले. मात्र मूळ वेगळेच असल्याचे या सभागृहात समोर आले.आमच्या दोन मंत्र्यांना या विषयात लक्ष घालावे लागले. याला कारणीभूत प्रशासन आणि ठेकेदार आहे. हे लोकांसमोर तुम्हीच आता सांगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT