bhaskar jadhav ESAKAL
कोकण

Bhaskar Jadhav: 40 वर्षात कधीही...; चिपळूणमधील सभेत भास्कर जाधव नेमकं काय बोलले?

Bhaskar Jadhav Speech: उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील सभेची उत्सुकता होती. सभेआधी त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते

कार्तिक पुजारी

Bhaskar Jadhav Speech- उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील सभेची उत्सुकता होती. सभेआधी त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, मी माझ्या निवडणुकीची काळजी कमी करतो. पण, ज्यांनी मला मदत केली त्यांना निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी मी जिवाचं रान करतो. शिवसेनेला सर्व ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे.

उशीजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही. पोलीस ठाण्यात यादी घेऊन कोण जात होतं? याला अटक करा, त्याला अटक करा कोण सांगतं होतं. आमच्या एका कार्यकर्त्याच्या बहिणीचे लग्न होते. त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी सोडले नाही. ते आता पोलीस राहिले नाहीत, ते लाचार झाले आहेत. त्यांच्या पदाला हा काळीमा आहे, अशी टीका जाधव यांनी केली.

ज्यावेळी संघर्षाची वेळ येते तेव्हा भास्कर जाधव स्वत: पुढे असतो. त्याचे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं. माझे कुटुंबीय, सर्व नातेवाईक रस्त्यावर होते. मुलगा, पुतण्या, जावई सर्व रस्त्यावर होते. विक्रांत बोलताना मला हुंदका आवरता येत नव्हता. विक्रांतने भाषणात बोलताना आपला तोल ढळू दिला नाही. त्याने चांगले विवेचन केलं. मी पण आजपर्यंत बोलताना कधीही तोल ढळू दिलेला नाही. ४० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत मी कधीही माय-बहिणीवर किंवा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.

आई-बहिणींबद्दल, सुनांबद्दल, मुलींबद्दल कधीही चुकीची भाषा वापरली नाही. मी आक्रमक आहे पण खालच्या पातळीवर कधीही बोलत नाही. विक्रांत देखील आक्रमक भाषण केलं पण, त्याने तोल ढळू दिला नाही याचे मी जाहीरपणे कौतुक करतो. पण, काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या पक्ष प्रमुखांबाबत खालच्या पातळीवर जाऊ टीका केली जात आहे. त्यांना उत्तर द्यायचं नाही का? आपण शांत बसायचं का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. जे घरभेदी आहेत ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते म्हणाले.

भास्कर जाधवांचे भावनिक पत्र

भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं होतं. ते म्हणाले होते, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं जात आहे. या सगळ्या वाटचालीत, संघर्षात माझा वैयक्तिक स्वार्थ काय आहे? मला अनेक विषयांवर तुम्हाला बोलायचं आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली होती. यासंदर्भात चिपळून येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT