कोकण

चिपळूण : व्हेलची उलटी खरेदीदारांचा शोध सुरू

वनविभागासमोर आव्हान; सहा संशयित ताब्यात, एकाच व्यक्तीला देणार होते?

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गुहागर तालुक्यातील वेळंब आणि चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या सहा संशयित आरोपींना पोलिस आणि वनविभागाच्या पथकाने पकडले. ते कुणाला व्हेल माशाची उलटी विकणारे होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे उघड करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.

चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ६.२ किलो व्हेल माशाची उलटी, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई सुरू असतानाच गुहागर तालुक्यातील वेळंब येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर गुहागर तालुक्यातील वेळंब येथे दुसरी कारवाई वनविभागाकडून करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ किलो १५० ग्रॅम उलटी जप्त केली आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे प्रसाद प्रवीण मयेकर (वय ३२, रा. भाट्येमिऱ्या, ता. रत्नागिरी), नरेंद्र वसंत खाडे, (वय ५४, रा. काखरतळे, ता. महाड, जि. रायगड), सत्यभामा राजू पवार (वय ४५, रा. दत्तनगर, माणगाव ता. महाड), अजय राजेंद्र काणेकर (वय ३६, रा. असगोली, ता. गुहागर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. वनविभाग व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळंब येथे रात्री ८ वाजता कारवाई केली. या प्रकऱणी तौफिक याकूब अलवारे (वय ३८, परचुरी, गुहागर), अब्दुल मजिद इस्माईल तांबे (वय ५६, रा. मिरजोळी, चिपळूण), चंद्रकांत शंकर कातळकर (वय ५१,वेळंब) यांना अटक केली आहे. हे सर्वजण कोणाला व्हेल माशाची उलटी विकणार होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

दोन्ही प्रकरणात व्यक्ती एकच?

वनविभागाने पहिली कारवाई खेरशेत येथे केली. त्यातील संशयिताने वेळंबची माहिती वनविभागाला दिली. म्हणजे दोन्ही ठिकाणचे संशयित एकाच व्यक्तीला उलटी विकण्यासाठी आले होते, असे स्पष्ट होते.

संशयितांकडून व्हेल माशाची उलटी विकत घेणाऱ्याचा शोध सुरू आहे. लवकरच यातील तस्करांना आम्ही पकडू.

- सचिन निलख,उपविभागीय वनाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT