Chiplun young man returning from London betrayed by Saint Gadge Baba sakal
कोकण

चिपळूण : लंडनहून परतलेला तरुण गिरवतोय संत गाडगेबाबांचा कित्ता

६० जणांचा ध्यास ; लंडनहून परतलेल्या तरुणाचा पुढाकार

नागेश पाटील -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : प्रसन्न वातावरणासाठी केवळ आपले घर व परिसर स्वच्छ असून चालणार नाही. आपण वास्तव्य करतो तेथील सार्वजनिक परिसर स्वच्छ व निसर्गमय हवा हे पक्के जाणून शहरातील प्रभातरोड येथील तरुण आशुतोष जोशी गाडगेबाबांचा कित्ता गिरवत स्वच्छतेसाठी योगदान देत आहे. त्याच्या घरामागील नारायण तलाव नियमित स्वच्छ राहण्यासाठी तो चिकाटीने काम करत आहे. लंडन येथून बीए इन विज्यू्अल आर्ट पदवी घेतलेला हा तरुण निसर्गसान्निध्यात आनंदी जीवनासाठी जागृती करीत आहे.

आशुतोष जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वीच लंडन येथील विद्यापीठातून पदवी संपादित केली. २०१८ पासून सार्वजनिक स्वच्छतेसाठी जनजागृती तसेच स्वतः स्वच्छता करायला सुरवात केली होती. मित्र मिराज जाधव याच्या साथीने नारायण तलाव परिसरातील झाडी तोडणे, लोकांनी टाकून दिलेल्या दारूच्या व पिण्याच्या पाण्याचा बाटल्या गोळा करणे, तलाव परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला. तलाव तसेच वाशिष्ठी नदी परिसरातून २ टन बाटल्या संकलित केल्या. त्याने इन्स्टाग्रामवरून माहिती प्रसारित केली. त्याला प्रतिसाद मिळून ६० जणांचा समूह तयार झाला. दोन वर्षांपूर्वी हा ६० जणांचा समूह शहरातील वाशिष्ठी नदी तसेच नारायण तलाव परिसरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करायचे. त्याचे काम पाहून पालिकेचे मुख्याधिकारी शिंगटे यांनी नंतर पालिकेचे कर्मचारी पाठवले. तलाव परिसरातील स्वच्छतेला चांगली गती मिळाली.

लंडन येथे क्लायमेट कौन्सिलचा सदस्य

लंडन येथे शिकताना त्याने तेथील यूथ क्लायमेट कौन्सिलमध्ये यूथ मेंबर म्हणून शासनासोबत काम केले होते. त्या वेळी कामाचा आराखडा करणे, झाडे लावणे, ग्रीन पिस तयार करणे, इलेक्ट्रिक बसेसच्या वेळेतील बदल आदी कामे करायचा. जुलै २०२१ मध्ये शिक्षण पूर्ण करून चिपळूणला आल्यावर १० दिवसांतच पूर आला. पुरानंतरही त्याने स्वच्छतेसाठी योगदान दिले.

''महिलांना रोजगार मिळण्यासाठी साडीच्या गोधडीपासून आकर्षक पर्स तयार करणे, शेतकऱ्यांसाठी कॉटन फार्मिंग आदी विषयावर प्रकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अगदी कमी गरजांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी जीवन जगता येते. सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा.''

- आशुतोष जोशी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT