Chippe Airport open January 2021 
कोकण

प्रतीक्षा संपली! चिपीवरून जानेवारीत `टेकऑफ`

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी 2021 अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्‍वासन नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांना दिले आहे. याबाबत खासदार प्रभू यांनी 3 डिसेंबरला पत्र लिहीत चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेला सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याकरिता खासदार प्रभू यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांना व्यक्तिश: विनंतीपत्र पाठवले होते. या पत्राची तत्परतेने दखल घेऊन मंत्री पुरी यांनी सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकार्याशी संबंधित कार्यवाहीला वेग देण्यात आल्याबाबत खासदार प्रभू यांना पत्र पाठवून माहिती दिली. 

नागरी हवाई संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाला भेट देऊन परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कार्यान्वन, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळाच्या विकासकांना दिले आहेत. खासदार प्रभू यांनी नागरी विमान मंत्री असताना देशांतर्गत विमान वाहतूक मार्गांसाठी कार्यान्वित केलेल्या उडान या योजनेअंतर्गत अलायन्स एअर या विमान कंपनीला चिपी विमानतळावरील उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली आहे.

चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचे अधिकांश काम नजीकच्या काही वर्षांमध्ये पूर्ण झालेले असून विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी जानेवारी 2021 अखेर हे लक्ष्य ठेवले गेले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी आवश्‍यक तो समन्वय साधावा याकरिता केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती केली आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT