कोकण

फसवे मंत्री वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा; चित्रा वाघ

- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. या शासनाने जनहिताचे एकही काम केलेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत व बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत. दररोज विधाने बदलत आहेत त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा वाघ(chitra Wagh)यांनी केली.(chitra-wagh-in-ratnagiri-today-regarding-obc-reservation-kokan-marathi-news)

ओबीसी आरक्षणासाठी भाजप महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. आज शासकीय विश्रामगृहात ही परिषद झाली. या वेळी वाघ म्हणाल्या की, आरक्षण रद्द झाले ते या नाकर्त्या सरकारमुळेच. न्यायालयाने १५ महिने दिलेले असूनही मागासवर्ग आयोग गठित केला नाही. डाटा दिला नाही. यात सरकारने जराही स्वारस्य दाखवले नाही. सत्तेतले मंत्रीच चिंतन बैठका घेत आहेत, आंदोलन करत आहेत. कसले आणि कोणाविरुद्ध करत आहेत. आयोग करण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे धुळ खात पडली होती. सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन आयोग गठित करायला हवा होता.

ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी आयोग गठित करतो, असे सांगितले. ५ दिवसांपूर्वी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे जाहीर केले. परंतु आता कालच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या सरकारला ओबीसींचे आरक्षण काढूनच घ्यायचे. फसवे, कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

पत्रकार परिषदेला रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ्ॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, महिला मोर्चा अध्यक्ष प्राजक्ता रुमडे, सरचिटणीस राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT