Citizens stopped the trick of releasing Nala water into the river 
कोकण

नाल्याचे पाणी नदीत सोडण्याचा डाव नागरिकांनी रोखला....

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण :  चिपळूण पालिकेकडून गोवळकोट रोड येथील पूर्वनियोजित नाल्याच्या दिशेत अचानक बदल करून विरुद्ध दिशेने वळवण्याचा खटाटोप करण्यात आला. याला गोवळकोटवासीयांनी तीव्र विरोध करीत काम बंद पडले. गोवळकोट चर येथे नदीपात्रात नाल्याचे पाणी सोडू देणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील गोवळकोट रोड येथील नाल्याचा प्रश्‍न वादग्रस्त बनला आहे. नवीन बांधकामांमुळे पूर्वीचा नैसर्गिक नाला अस्तित्वात राहिलेला नाही. परिणामी या भागातील सांडपाणी वाहण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी तुंबून राहत आहे. या भागात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. त्यासाठी पालिकेने नाला गोवळकोट रस्त्याच्या पलीकडे वाशिष्ठी नदीच्या दिशेने वळवण्याचा प्रस्ताव मांडला होता; परंतु त्या भागात एका बड्या व्यक्तीचे बांधकाम सुरू असल्याने काहींचा विरोध झाला. परिणामी हा प्रस्ताव धूळ खात पडला होता. आता याप्रश्‍नी पालिकेने पुन्हा लक्ष घातले आहे. 

पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी आज जेसीबी घेऊन तेथे दाखल झाले. श्री देवी करंजेश्वरी स्वागत कमानीपासून गोवळकोट चर या ठिकाणापर्यंत नाला काढण्याचे काम हाती घेतले, मात्र या नाल्यामुळे थेट वाशिष्ठी नदीला सांडपाणी वाहून जाईल. नजीक असलेल्या पालिकेच्या पाणी योजनेतील जॅकवेललाही दूषित पाणी उचलले जाईल. त्यामुळे हे चुकीचे काम करू देणार नाही, असा इशारा येथील नागरिकाकंडून दिला. या वेळी नगरसेवक भगवान बुरटे, सुषमा कासेकर, वसंत हरवडे, सुरेश शिंदे, दत्ताराम हेलवंडे, कट्ट्या देवळेकर, विकी लवेकर, सतीश चांदिवडे, केतन निवाते, प्रतीक गोरीवले आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT