Cleaning Of Ratnadurga By Jiddi Mountaineering Ratnagiri Marathi News  
कोकण

जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी- जिद्दी माऊंटेनिरिंगच्या टीमने सलग पाचव्या वर्षी रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. मात्र यंदा भरपूर कचरा आणि दारुच्या बाटल्यांचा खच आढळला. मर्द मावळ्यांच्या इतिहासाने गाजलेल्या या किल्ल्यावर मजा मारणाऱ्यांनी दारुच्या बाटल्या तेथेच टाकल्याने तेथे बंदोबस्ताची मागणी जनतेतून होत आहे. 

प्रजासत्ताक दिनी जबाबदारीची जाणीव ठेवत स्वच्छता मोहीम आखण्यात आली. या मोहिमेला सार्थ हाक देत आणि फिनोलेक्‍स ऍकॅडमीच्या इलेक्‍ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत मोहीम पूर्ण केली. साफसफाई करताना खाऊचे प्लास्टिक पॅकेट, पिण्याच्या पाण्यासाठी वा थंड पेयासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या किल्यावर आणि अवतीभोवती सापडल्या. त्या एका ठिकाणी गोळा करून पालिकेच्या टीमला कल्पना दिली. रस्त्याच्या ठराविक अंतरावर दारूच्या काचेच्या बाटल्या टाकलेल्या दिसल्या. या बाटल्या एका ठिकाणी गोळा करण्यात आल्या. 

""दर महिन्याला असेच चित्र येथे पाहायला मिळते. किल्ला व भगवतीदेवीचे मंदिर पाहण्यासाठी देश - विदेशातून पर्यटक, भाविक येतात, त्यांनाही या साऱ्या गोष्टींचा त्रास होतो. समस्त रत्नागिरीकरांनी प्रत्येकाला जसे जमेल तसे योगदान देऊन आपली रत्नागिरी स्वच्छ रत्नागिरी करण्यात हातभार लावावा.'' 
- धीरज पाटकर 
अध्यक्ष, जिद्दी माऊंटेनिरिंग 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT