A close look at the head of the fisheries jetty at the port kokan marathi news 
कोकण

बंदरावर मत्स्य विभागाची प्रमुख जेटींवर करडी नजर...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख जेटींवर मत्स्यविभागाने सागरी सुरक्षा रक्षक यांच्याकडून कडक बंदोबस्त ठेवला आहे. मिरकरवाडा बंदरावर नेहमी छोटी वाहने व माणसे यांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. पण सागरी सुरक्षा रक्षकांनी यावर चोख नियंत्रण ठेवले आहे. सद्यस्थितीत बंदरावर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे.

बंदरावर अत्यावश्यक सेवा सुरू

मिरकरवाडा, भगवती बंदर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मासळी उतरवण्याच्या बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता शासनाने संचारबंदी लागू केली असली तरीही मुंबईतून सागरी मार्गाचा वापर करून बोटीने काही लोक कोकणात येत आहेत. हे रोखण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक हे 24 तास आपले कर्तव्य बजावत आहेत.

रत्नागिरी विभागामध्ये कोरोनाचा प्रसार थांबवणे व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी काम करत आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी एन. व्ही. भादुले, रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, परवाना अधिकारी रत्नागिरी डॉ. रश्मी आंबुलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार सुदय करगुटकर हे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT