cloudburst in lanja ratnagiri again damages the crop and day today life in ratnagiri 
कोकण

लांजात पुन्हा ढगफुटी ; कापणी केलेली शेती जाणार वाया

सकाळ वृत्तसेवा

लांजा : तालुक्‍यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खंडित झाली. विलवडे येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणारी गुरे ग्रामस्थांनी सुखरूपपणे बाहेर काढली.

चार दिवसांपूर्वी लांजा तालुक्‍यात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. पाठोपाठ बुधवारपासून (१४) सुरु झालेल्या पावसाचा जोर गुरुवारीही कायम होता. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकूंदी नदीला पूर आला. दाभोळे कुरचुंब येथे वहाळावरुन पाणी जात होते. अक्षरशः नदीसारखे रूप आले होते. त्यामुळे सुमारे चार तास वाहतूक खंडित झालेली होती. विलवडे-खामकरवाडी येथे पुराचे पाणी नदीकाठच्या  वाडीत शिरले.

मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले होते. शनिवार सायंकाळपासून व रविवारी दिवसभर पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतो की काय यांची चिंता लागली आहे. पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. संततधार कोसळणाऱ्या पावसाने उघडी प केल्याने व कडकडीत उन्ह पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकलेली भातशेती कापणीला सुरुवात केली असतानाच पावसाच्या शक्‍यतेने शेतकरी धास्तावला.

रात्री ८ च्या दरम्यान पावसाचा जोर वाढला तो दुसऱ्या दिवशी रविवारी देखील राहिला. त्यामुळे कापणी केलेली भातशेती पावसामध्ये भिंजत राहिली आहे. सलग दोन दिवस पाण्यात तसेच पडून राहिल्याने भाताला धुमारे फुटू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

जीव धोक्‍यात घातल्यानेच जनावरे सुखरुप

बौध्दवाडीतील सुरेश मोहिते याची आठ गुरे पुराच्या पाण्यात अडकली होती. पुराच्या पाण्याने ती वाहून जाण्याचा धोका होता. आठ जनावरांचा जीव वाचवण्यासाठी पहाटेपासून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू झाले. ही जनावरे वाचवण्यासाठी येथील ग्रामस्थांनी जीव धोक्‍यात घातला. आठ जनावरे पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्यात त्यांना यश आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT