कोकण

पूरस्थितीत हाताळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

अर्चना बनगे

चिपळूण: मागील काही वर्षांपासून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एनडीआरएफ टीम (NDRF Team) स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे सध्या कोकण (Konkan) दौऱ्यावर असून येथील पूरस्थिती परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना त्यांनी दिलासा दिला. पूरग्रस्तांना मदत देताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देणार. दोन दिवसांत आढावा घेऊन ही मदत जाहीर करणार असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी दिले.CM-Uddhav-Thackeray-visit-on-Konkan-flood-ratnagiri-raun-update-live-news-akb84

चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चीपळून दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर ,कराड, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी दरवर्षी पूर येत असतो. याविषी चिपळूणात महापुराने हाहाकार माजवला आहे. या धर्तीवर स्थानिक पातळीवर होणारी एनडीआरएफ ही टीम खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या असणाऱ्या टीममध्ये ही टीम अॅड होणार असून स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात टीम तैनात होणार आहे.

सकाळीच दौरा करत असताना व्यापारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पत्रकारांना माहिती देत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, पूरग्रस्तांना मदत देताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. शिवाय दोन दिवसात आढावा घेऊन मदत जाहीर करणार आहोत. उद्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पाहणी करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ टीम तैनात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी फोनवरून चौकशी केली आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला तात्काळ भरपाई दिली जाणार आहे.कोल्हापूर सांगली आणि धोक्याच्या पातळीवर आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगलीत नुकसान झालेले आहे. यासाठी उद्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पाहणी करणार आहे. तात्काळ नागरिकांना गरजेच्या वस्तुची मदत केली जाणार आहे. पुरात सर्वच काही वाहून गेल्याने तातडीची मदत पोहोचण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT