CM uddhav thakre on pophali project tour on ratnagiri 
कोकण

मुख्यमंत्री आले कधी, गेले कधी समजलेच नाही

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारी मार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा कोयने मार्गे माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी हे स्थानिकांना समजलेच नाही. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, बाळासाहेब पाटील, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, राजन साळवी आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे आलोरेला येणार म्हणून गेली दोन दिवस शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कोयना प्रकल्प ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे येथे परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर राहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवाल निगेटिव्ह आलेल्या अधिकाऱ्यांनाच त्यांच्या दौऱ्यात प्रवेश देण्यात आला होता. 

यादरम्यान कोयना प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांकडून विशेष पासची व्यवस्था करण्यात आली होती. पोफळी आलोरे कुंभार्ली कोळकेवाडी गावच्या सीमेवर प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोफळीतील विश्रामग्रह वीज निर्मिती कार्यालय आणि याठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच कुंभार्ली घाटात पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्वे, सभापती धनश्री शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी तसेच शासनाच्या विविध खात्याचे अधिकारीही विश्रामगृहात थांबले होते. आलोरे येथे शिवसेनेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते परंतु मुख्यमंत्री ठाकरे वीज निर्मिती प्रकल्पातून बाहेर आलेच नाही.

सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टर आले तेव्हा मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्याचे कळले. दुपारी एकच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले, तेव्हा मुख्यमंत्री गेल्याचे लोकांना समजले. कोयना प्रकल्पाची पाहणी करून ते माघारी परतल्यामुळे स्थानिक लोक त्यांच्या दौऱ्यात पासून अलिप्त राहिले.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT